Wednesday, January 13, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन मलायका अर्जुनच्या नात्याला ट्रोल करणाऱ्यांना मलायकाचं सडेतोड उत्तर

मलायका अर्जुनच्या नात्याला ट्रोल करणाऱ्यांना मलायकाचं सडेतोड उत्तर

'जेव्हा एखादा पुरूष लहान असलेल्या महिलेला डेट करतो तेव्हा त्याला ड्यूड म्हटले जाते. पण जेव्हा एक स्री तिच्यापेक्षा कमी वयाच्या मुलासोबत डेट करते तेव्हा ते सगळ्यांना खटकते'

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्रा मलायका अरोरा नेहमीच कोणत्या ना कोणत्या विषयावरून चर्चेत असते. यात जास्त चर्चा या तिच्या रिलेशनशिपविषयी असतात. मलायकाच्या रिलेशनशिप विषयी बॉलिवूड तसेच सोशल मीडियावरही अनेक चर्चा सुरू असतात. तिच्या वयापेक्षा दहा वर्षांनी लहान असलेल्या अर्जुन कपूरसोबत ती डेट करत असल्याने तिच्यावर अनेक टिका आणि अनेक प्रश्न विचारले जातात. मात्र मलायका या सगळ्याला छेद करत नेहमीच सडेतोड उत्तर देत असते. असेच सडेतोड उत्तर यावेळीही मलायकाने दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)


मलायका गेली अनेक दिवस अभिनेता अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दोघांच्या डेटींगचे अनेक फोटो सोशल मीडियावर पहायला मिळत असतात. नेटकरी अनेक वेळा दोघांना चांगलचं ट्रोल करताना दिसतात. एका मुलाखतीत मलायकाने या प्रश्नांवर आणि ट्रोलिंगवर चांगलेच उत्तर दिले आहे. ‘पुरूष जेव्हा पुढे निघून जातो तेव्हा कोणालाही काही फरक पडत नाही. पण जेव्हा एक स्री असं करते तेव्हा लोकांना ते पाप वाटते. ‘जेव्हा एखादा पुरूष लहान असलेल्या महिलेला डेट करतो तेव्हा त्याला ड्यूड म्हटले जाते. पण जेव्हा एक स्री तिच्यापेक्षा कमी वयाच्या मुलासोबत डेट करते तेव्हा ते सगळ्यांना खटकते’, असे सडेतोड उत्तर देऊन मलायकाने ट्रोलर्सची तोंड बंद केली आहेत. असे भेदभाव नेहमीच केले जातात याचे मला खूप वाईट वाटते. यात बदलही होतील पण त्याला थोडा वेळ लागेल असेही मलायका म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

- Advertisement -

मलायकाने २०१९ मध्ये तिच्या आणि अभिनेत अर्जुन कपूरच्या नात्याचा खुलासा केला होता. नव्या वर्षांत मलायका आणि अर्जुन गोव्यामध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. सुट्ट्यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.


- Advertisement -

हेही वाचा – राखी सावंतवर यशराजचं भन्नाट रॅप साँग

- Advertisement -