घरताज्या घडामोडी'तान्हाजी' चित्रपट पाहण्यासाठी विद्यार्थ्याने मागितली सुट्टी

‘तान्हाजी’ चित्रपट पाहण्यासाठी विद्यार्थ्याने मागितली सुट्टी

Subscribe

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण, सैफ अली खान आणि अभिनेत्री काजोल यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘तान्हाजी- द अनसंग वॉरिअर’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन १० दिवस पूर्ण झाले असून अजूनही चित्रपटाच्या कमाईत घट होताना दिसत नाही आहे. फक्त १० दिवसांमध्ये १६७.४५ कोटींची कमाई या चित्रपटाने केली आहे. एका बाजूला बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट धुमाकूळ घालत आहे तर दुसऱ्या बाजूला या चित्रपटाबाबत लिहिलं पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मालेगावच्या भावेश या मुलाने ‘तान्हाजी’ चित्रपट पाहण्यासाठी चक्क मुख्याध्यापकांना पत्र लिहिलं आहे.

भावेश पापालाल राहाड असं या मुलाचं नावं असून तो बाल संस्कार सेमी इंग्लिश स्कुल फरंजगव्हाण तालुका मालेगाव येथे शिकत आहे. त्याने मुख्याध्यापकांना ‘तान्हाजी’ चित्रपट पाहण्यासाठी एक दिवसाची रजा मिळावी याकरिता पत्र लिहिलं होत. तसंच त्याला एक दिवसाच्या रजेला मुख्यापकांनी परवानगी देखील दिली आहे.

- Advertisement -

पत्रा नेमकं काय लिहिलं?

“इतिहासातील शूरवीर ज्यांच्याबद्दल आम्हाला पुस्तकात खूप कमी प्रमाणात माहिती आहे. अशा महाराष्ट्रातल्या मातीतीतल योध्दा नरवीर तान्हाजी मालुसरे यांची अधिक माहिती मिळण्यासाठी त्यांच्यावर आधारित सिनेमा पाहण्यासाठी एक दिवसाची रजा मिळावी ही नम्रविनंती.”

- Advertisement -

हेही वाचा – मी तान्हाजीच्या इतिहासाशी सहमत नाही…


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -