घरमनोरंजनमल्लिका शेरावतचा कास्टिंग काऊचवर नवा खुलासा

मल्लिका शेरावतचा कास्टिंग काऊचवर नवा खुलासा

Subscribe

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये मल्लिकानं नुकतंच 'कास्टिंग काऊच'बद्दल आपला अनुभव सांगितला आहे. मल्लिकाला चित्रपटातून यासाठी बाहेर काढण्यात आलं कारण तिनं आपल्या सहकलाकारासह चित्रीकरणानंतर जवळीक वाढवण्यास नकार दिला असा खुलासा तिनं वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये केला आहे.

पहिल्याच चित्रपटापासून आपल्या बोल्ड आणि ब्युटीफूल अवतारात प्रेक्षकांसमोर आलेल्या मल्लिका शेरावतनं नेहमीच चर्चेत राहणाऱ्या बातम्या दिल्या आहेत. आपल्या बोल्ड अवतारासाठी प्रसिद्ध असणारी मल्लिका अतिशय फटकळ म्हणूनदेखील ओळखली जाते. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये मल्लिकानं नुकतंच ‘कास्टिंग काऊच’बद्दल आपला अनुभव सांगितला आहे. मल्लिकाला चित्रपटातून यासाठी बाहेर काढण्यात आलं कारण तिनं आपल्या सहकलाकारासह चित्रीकरणानंतर जवळीक वाढवण्यास नकार दिला असा खुलासा तिनं वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये केला आहे.

मल्लिकानं केला खुलासा

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत मल्लिकांनं कास्टिंक काऊचबद्दल खुलासा केला. ‘मला एका प्रोजेक्टमधून केवळ यासाठी बाहेर काढण्यात आलं कारण हिरोशी जवळीक वाढवण्यास मी नकार दिला होता.’ असं नेहमीप्रमाणं खळबळजनक वक्तव्य मल्लिकानं केलं आहे. ‘तू ऑनस्क्रिन हे करू शकतेस, तर खासगी आयुष्यात ही जवळीक का वाढवू शकत नाही?’ असंही ‘त्या’ हिरोनं आपल्याला विचारलं असल्याचं मल्लिकानं म्हटलं आहे. ‘या सगळ्यामुळं माझ्या हातून बरेच प्रोजेक्ट गेले. त्यामुळं यातूनच आपल्या समाजातील महिला कोणत्या परिस्थितीला तोंड देत असतात हे दिसून येतं’ अशी खंतही मल्लिकानं व्यक्त केली आहे. ‘पुरुष नेहमी फायदा उचलण्याचा प्रयत्न करतात, तर आपण जशा व्यक्तिरेखा साकारतो त्यावरून आपल्याला जज केलं जातं. जर तुम्ही तोकडे कपडे घालत असाल, ऑनस्क्रिन किस घेत असाल तर तुम्ही अतिशय हीन दर्जाची महिला असल्याचा पुरुषांचा दृष्टीकोन असतो. त्यामुळं पुरुष तुमच्याशी जवळीक वाढवण्याचा प्रयत्न करत असतात.’ असंही स्पष्ट मत मल्लिकानं या मुलाखतीमध्ये व्यक्त केलं आहे.

- Advertisement -

सकाळी ३ वाजता भेटायला बोलवत होते निर्माते

मल्लिकानं या मुलाखतीत कास्टिंग काऊचबद्दल भरभरून माहिती दिली आहे. ‘मी अशा क्षेत्रातून आले आहे की प्रचंड संघर्ष करावा लागला मात्र ते न बघता मी पडद्यावर किती किस घेतले याचीच चर्चा जास्त होते.’ असंही तिनं सांगितलं. ‘मी अतिशय स्वच्छ मनाची असून कोणत्याही प्रकारची तडजोड करू शकत नाही. मला पूर्ण आत्मविश्वास असून गर्व आहे. एक वेळ अशी होती की, निर्माते मला मीटिंगसाठी पहाटे ३ वाजता बोलावत होते. याविषयी बोलायला मी आधी खूप घाबरत होते, कारण मलाच यामध्ये चुकीचं ठरवलं जाईल असं मला वाटायचं. आपल्या देशात नेहमीच पीडित व्यक्तीवर आरोप लावला जातो.’ असं मत मल्लिकानं मांडलं. मल्लिका २०१५ मध्ये आलेल्या ‘डर्टी पॉलिटिक्स’मधून प्रेक्षकांसमोर आली होती. लवकरच तिचा ‘जीनत’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -