‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’साठी अशी तयारी करतेय मल्लिका शेरावत

मल्लिका कान्स सोहळ्यात सहभागी होण्यास खूपच उत्सुक आहे. या तयारीचा व्हिडिओ मल्लिकाने आपल्या सोशल मीडियावर नुकताच शेअर केला

Mumbai

चित्रपट विश्वात प्रतिष्ठेचा मानला जाणारा सोहळा म्हणजे कान्स फिल्म फेस्टिव्हल २०१९. या सोहळ्याची सुरूवात १४ मे पासून झाली आहे. १२ दिवस चाललणाऱ्या या सोहळ्यात जगातील बऱ्याच चित्रपट निर्मात्यांसह कलाकार देखील सहभागी होणार आहे. या सोहळ्यात सगळे कलाकार रेड कारपेटवर आपली झलक दाखवताना दिसणार आहे. यामध्ये अभिनेत्री मल्लिका शेरावतचेही नाव सध्या चर्चेत आहे. मल्लिका कान्स सोहळ्यात सहभागी होण्यास खूपच उत्सुक आहे. या तयारीचा व्हिडिओ मल्लिकाने आपल्या सोशल मीडियावर नुकताच शेअर केला आहे.

या शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मल्लिका फिकट निळ्या रंगाच्या गाउनमध्ये खूपच सुंदर दिसतेय. या गाउनला टोनी वार्डने डिझाईन केला असून ती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. मल्लिका या कान्स फिल्म फेस्टिव्हल २०१९ मध्ये सहभागी होण्याकरिता १७ मे ला फ्रान्सच्या कान्स शहरात रवाना होणार आहे. २० मे ला मल्लिका रेड कारपेटवर आपल्या अदांनी रसिकांना घायाळ करणार हे मात्र नक्की.

या शानदार सोहळ्यात ऐश्वर्या राय बच्चन, दिपीका पादुकोन, सोनम कपूर, हुमा कुरैशी, हिना खान, कंगना रनौत आणि डायना पेंटी ही ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल २०१९’च्या रेड कारपेटवर वॉक करताना दिसणार आहे. यंदाच्या सोहळ्यात कोणीही कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या विभागातून नॉमिनेट झाले नाही,अशी घटना ९ वर्षात पहिल्यांदाच होणार आहे. या सोहळ्यादरम्यान काही भारतीय लघुपटांचे स्क्रिनिंग देखील करण्यात येणार आहे.