घरताज्या घडामोडीVideo: सोनू सूदसाठी मजुरांने गायलं गाणं; सोनू म्हणतो, तुला पुन्हा मुंबईला उचलून...

Video: सोनू सूदसाठी मजुरांने गायलं गाणं; सोनू म्हणतो, तुला पुन्हा मुंबईला उचलून आणू का?

Subscribe

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाऊन जारी करण्यात आला. मात्र या लॉकडाऊनमुळे अनेक मजूर वेगवेगळ्या राज्यात अडकले. यादरम्यान या अडकलेल्या मजुरांसाठी देवासारखा धावू आला तो म्हणजे बॉलिवूडचा अभिनेता सोनू सूद. पडद्यावरचा खलनायक हा खऱ्या आयुष्यातला रिअर हिरो झाला. त्याने अनेक मजुरांना त्यांच्या घरी सुखरुप पोहोचवले आहे. सोनू सूदच्या या कामाचे सर्वस्तरातून कौतुक केलं जात आहे. आता एका ट्विटर युजरने सोनू सूदला खास गाणं समर्पित केलं आहे. सोनूला हे गाणं खूप आवडलं आहे.

ट्विटर युजर अभिषेक कुशवाहा याने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो ‘जाँबाज’ या चित्रपटातील ‘तेरा साथ है कितना प्यार’ या गाण्याच्या चालीवर सोनू सूदसाठी गाणं गाताना दिसत आहे. ‘सोनू सूद जैसा नहीं, है कोई इंसान. दुखियां का दुख बाट दे, है वो बडे महान’, अशाप्रकारे त्याने हे गाणं गायलं आहे. या गाण्याचं ट्विट करताना कुशवाहने लिहिले आहे की, ‘भैय्या, आशीर्वाद पाहिजे.’

- Advertisement -

या व्हिडिओ सोनूने प्रतिसाद दिला असून रिट्विट केलं आहे. सोनू सूद म्हणाला की, ‘भाई, इतकं चांगलं गाशीलं तर मी तुला घरातून उचलून मुंबईला घेऊन येईन. मग घरी जायचं आहे असं किती वेळा जरी बोललास तरी घरी जाऊ देणार आहे. पाठवू शकतो तर परत आणू ही शकतो.’ त्यामुळे सोनू सूद या भन्नाट प्रतिसादामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

- Advertisement -


हेही वाचा – बिहारमध्ये सोनू सूदचा पुतळा उभारण्याची तयार सुरू; हे समजताच तो म्हणाला…


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -