घरमनोरंजनकंगनाच्या मणिकर्णिका चित्रपटाचा टीझर लाँच

कंगनाच्या मणिकर्णिका चित्रपटाचा टीझर लाँच

Subscribe

गेल्या कित्येक दिवसांपासून सिने वर्तुळात, माध्यमांमध्ये आणि सिनेरसिकांमध्ये चर्रचा असलेल्या कंगना रणौट ‘मणिकर्णिका – द क्वीन ऑफ झांसी’ चित्रपटाचा टीझर आज प्रेक्षकांच्या भेटीस आला. टीझर लोकांना आवडला असल्याचे त्याला मिळालेल्या लाईक्स आणि कमेंट्सवरून लक्षात येतंय. चित्रपटाचा टीझर नक्कीच दमदार असा आहे. चित्रपटाला महानायक अमिताभ बच्चन यांचे नरेशन लाभलं आहे. टीझरची सुरूवातच मुळात बीग बी यांच्या दमदार आवाजाने होते. बीग बी त्यांच्या भारदस्त आवाजात राणी लक्ष्मीबाई यांची गोष्ट सांगत आहेत. यात कंगना इंग्रजांविरोधात लढताना पहायला मिळत आहे. टीझरच्या शेवटी कंगना ‘हर हर महादेवचा’ जयघोष करते. हर हर महादेवचा जयघोष ऐकताना अंगावर काटा येतो. कंगनाने चित्रपटासाठी खूप जबरदस्त मेहनत केली असल्याचे या चित्रपटाच्या टीझरमध्ये दाखवलेले अॅक्शन सीन्स पाहून लक्षात येत आहे.

कंगनाने या चित्रपटातील राणी लक्ष्मीबाईच्या भूमिकेसाठी कठोर मेहनत घेतली आहे. या सिनेमासाठी तिने घोडेस्वारीसोबत तलवारबाजीचे धडे गिरवले आहेत. यामध्ये तिने अनेक स्टंटदेखील केले आहेत. अनेक स्टंट करण्यासाठी तिने बॉडी डबलची मदत घेतलेली नाही. अनेक स्टंट तिने स्वतः केलेले आहेत.

- Advertisement -

चित्रपट आणि कॉन्ट्रोव्हर्सी

चित्रपटाची घोषणा केल्यापासून तो चर्चेचा विषय ठरतोय. चित्रपट अनेकदा कॉन्ट्रोव्हर्सीमध्येदेखील अडकला. सुरूवातीला हा चित्रपट दक्षिणेतले ख्यातनाम दिग्दर्शक क्रिश दिग्दर्शित करत होते. परंतु कंगनाच्या हस्तक्षेपामुळे क्रिश यांनी हा सिनेमा अर्धवट सोडून दिला. त्यानंतर कंगनाने चित्रपटाच्या उरलेल्या भागाचे दिग्दर्शन स्वतः केले आहे. क्रिशपाठोपाठ अभिनेता सोनू सूदनेदेखील हा चित्रपट सोडून दिला. कंगनाच्या सततच्या दिग्गदर्शनातल्या हस्तक्षेपाला वैतागून त्याने हा चित्रपट सोडून दिला असल्याचे त्याने माध्यमांना सांगितले. ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’ हा चित्रपट पुढील वर्षी २५ जानेवारी २०१९ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -