घरमनोरंजनअश्लीलतेच्या आरोपामुळे लेखक मंटो यांनी सहा वेळा चढली कोर्टाची पायरी

अश्लीलतेच्या आरोपामुळे लेखक मंटो यांनी सहा वेळा चढली कोर्टाची पायरी

Subscribe

दररोज एक कथा लिहून मंटो भरत होते आपले पोट.

ऊर्दूतील प्रसिद्द लेखक सआदन हसन मंटो हे त्यांच्या अनेक गोष्टींमुळे प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कथा अश्लील असल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला होता. तब्बल सहा वेळा त्यांच्या कथा अश्लील असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. ज्यामुळे त्यांना अनेक वेळा कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागल्या. मात्र बऱ्याच वेळा ही प्रकरणे सिद्ध होऊ शकली नाहीत. मंटो यांच्या कामाचे अनेक अनुवादही करण्यात आले. त्यांनी लिहिलेल्या काली सलवार या कथेवरही अश्लीलतेचे आरोप करण्यात आले होते. त्यांच्या लिहिलेल्या कथेप्रमाणेत त्यांचा जिवनप्रवासही तितकाच आकर्षक होता. अभिनेत्री दिग्दर्शिका नंदिता दास हिने मंटोच्या जिवनावर बायोपिकही केला. ज्यात नवाजिद्दीन सिद्धीकीने मंटो यांची मुख्य भुमिका साकारली होती.

लेखकासोबतच मंटो होते उत्तम पत्रकार 

सआदत हसन मंटो हे उत्कृष्ट लेखक होते. लेखनासोबत ते सिनेमा आणि रेडिओसाठी पटकथा लेखनही करायचे. त्याचबरोबर ते उत्तम पत्रकारही होते. त्याच्या जिवनप्रवासात त्यांनी बावीस लघु कथा संग्रह, एक उपन्यास, रेडिओवरिल नाटकांचे पाच संग्रह लिहिले आहेत. मंटो हे विविध विषयावर लेखन करणारे लेखक होते. दररोज एक कथा लिहून ते आपले पोट भरत होते. दररोज एक कथा लिहून ती विकत होते. त्यांना मिळालेल्या पैशातून त्यांचे घर आणि त्यांच्या दारू सिगरेटचा खर्च निघत असे.

- Advertisement -

मंटोंच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना 

मंटो त्यांच्या जिवनातील महत्त्वाचा घटनांविषयी सांगताना ते म्हणायचे की, माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे माझा जन्म आहे. त्यांच्या जन्म पंजाबच्या समराला गावात झाला. माझा वाढदिवस जर कोणाच्या लक्षात असेल तर ती माझी आई आहे, असे ते म्हणायचे. माझ्या आयुष्यात दुसरी महत्त्वाची घटना म्हणजे पंजाब युनिर्वसिटीमधून दहावीची परिक्षेला मी सलग तीन वेळा नापास झालो होतो. तिसरी महत्त्वाची घटना म्हणजे १९३९मध्ये माझे लग्न झाले. याशिवाय अनेक घटना घडल्या मात्र त्याचा परिणाम माझ्यावर झाला नाही. माझ्या लेखन ही माझ्या आयुष्यातील महत्त्वाची घटना होती असे ते म्हणायचे.

नंदिता दासने बनवला मंटोंवर बायोपिक 

अभिनेत्री नंदिता दास हिने मंटो यांच्यावर आधारित बायोपिक बनवला. ज्यात अभिनेता नवाजुद्दीन सिद्धीकी यांने प्रमुख भुमिका साकारली. सिनेमातून मंटोचा जिवनप्रवास आणि त्यांचे समाज असलेले नाव त्यातील खरेपणा सिनेमातून हुबेहुब मांडण्यात आला होता. देशाचे विभाजन होण्याच्या आधीची आणि देश विभाजन झाल्यानंरची आहे. मंटो यांची मुंबईतील जिवन, देशाचे विभाजन झाल्यानंतर त्यांचे लाहोर जाणे यावर हा सिनेमाचे कथानक आधारित होते. देशाचे विभाजनामुळे मंटो यांच्या जिवनात खूप फरक पडला. मंटो यांना मुंबईविषयी खूप जिव्हाळा होता. मात्र देशाच्या विभाजनानंतर त्यांना नाईलाजस्तव पाकिस्तानला जावे लागले.

- Advertisement -

हेही वाचा – ‘या’ टॉप वेबसीरिजही अडकल्या होत्या वादाच्या भोवऱ्यात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -