अभिनेत्री सविता मालपेकर यांच्यासह अनेक कलाकारांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश!

मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत मुंबई प्रदेश कार्यालयात जाहीर प्रवेश केला.  मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर, माया जाधव, ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर, लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता प्रियदर्शन जाधव, लेखक कौस्तुभ सावरकर, दिग्दर्शक संतोष भांगरे, अभिनेते गिरीश परदेशी, बाळकृष्ण शिंदे, निर्माता शाम राऊत, अभिनेते डॉ. सुधीर निकम, उमेश बोळके, मोहित नारायणगावकर आदींसह इतर सहकलाकारांचा समावेश आहे.

मराठी कलाकारांचा राष्ट्रवादीत प्रवेश

यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे, आरोग्य मंत्री राजेश टोपे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे,आमदार अमोल मिटकरी, पक्षाचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, चिटणीस संजय बोरगे, युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, मुंबई युवती अध्यक्षा अदिती नलावडे आदी उपस्थित होते.

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनीही राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला होता. लॉकडाऊनच्या काळात पुण्यामध्ये प्रिया बेर्डे यांनी सुप्रीया सुळे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला होता. आता अनेक कलाकारांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. या कलाकारांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीचा सांस्कृतिक सेल अधिक मजबूत होणार आहे.


हे ही वाचा – अभिनेत्री सविता मालपेकर करणार राष्ट्रवादी पक्षात प्रवेश