घरमनोरंजनमृण्मयी देशपांडेचा 'नवीन' चित्रपट लवकरच

मृण्मयी देशपांडेचा ‘नवीन’ चित्रपट लवकरच

Subscribe

मृण्मयी देशपांडेच्या 'बोगदा' चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आलं आहे. हे पोस्टर चित्रपटाच्या कथेची उत्सुकता वाढवणारं आहे. 

अग्निहोत्र मालिकेमधून सर्वांसमोर आलेला एक गोड चेहरा म्हणचे अभिनेत्री मृण्मयी देशपांडे. मृण्मयीने आजवर अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमधून काम केलं आहे. अग्निहोत्र आणि कुंकू या मालिका असोत किंवा कट्यार काळजात घुसली आणि नटसम्राटसारखे चित्रपट असोत, मृण्मयीने नेहमीच आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये तिने सूत्रसंचालनही केलं आहे. काही दिवसांपूर्वी तिचा शिकारी हा चित्रपट रिलीज झाला होता. लवकरच मृण्मयीचा ‘बोगदा’ हा नवा चित्रपट तुमच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच मृण्मयी देशपांडेसोबत ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी झळकणार आहेत. नुकतंच बोगदा चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आलं आहे. हे पोस्टर चित्रपटाच्या कथेची उत्सुकता वाढवणारं आहे.

bogda movie poster
बोगदा चित्रपटाचं पोस्टर (सौजन्य-इन्स्टाग्राम)

असा आहे बोगदा प्रवास

बोगदा चित्रपटामध्ये आई-मुलीच्या नात्याची गोष्ट सांगण्यात आली आहे. आई आणि लेक यांच्या नात्यातीन बरेच पैलू या सिनेमामध्ये उलगडण्यात आले आहे. चित्रपटाची कथेतील दोन मुख्य पात्रं स्त्रियाच आहेत. माय-लेकीमधील हळूवार नातं, त्यांच्यातील विश्वास आणि सोबतच त्यांच्यात होणारे मतभेद किंवा उडणारे खटके या सगळ्या पैलूंची हळुवार गुंफण या चित्रपटात करण्यात आली आहे.  विश्वासाचा आढावा घेणारी ही कथा आहे. निशिता केणी लिखीत-दिग्दर्शीत हा चित्रपट येत्या ७ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

- Advertisement -

मृण्मयी दिग्दर्शिकेच्या भूमिकेत

दरम्यान बोगदा चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणारी मृण्मयी लवकरच एका चित्रपटाचं दिग्दर्शनही करणार आहे. ‘के सरा सरा’ या चित्रपटाचं मृण्मयी देशपांडे दिग्दर्शन करणार असल्याचं समजतंय. यानिमित्ताने मृण्मयी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहे. चित्रपच दिग्दर्शन करण्याचं तिचं बऱ्याच वर्षांचं स्वप्न यानिमित्ताने अखेर पूर्ण होणार आहे. हनीमूननंतर नवरा-बायकोच्या नात्यात होणारे बदल, या विषयावर ‘के सरा सरा’ चित्रपट भाष्य करणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -