घरमनोरंजनचाहतीच्या सततच्या मेसेजला कंटाळून अभिनेत्याने घेतला 'हा' निर्णय

चाहतीच्या सततच्या मेसेजला कंटाळून अभिनेत्याने घेतला ‘हा’ निर्णय

Subscribe

आपल्या आवडत्या कलाकारांना भेटण्यासाठी, त्यांच्याबरोबर सेल्फी घेण्यासाठी नेहमीच प्रयत्न करत असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सशी संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. आता सोशल मीडियामुळे फॅन्सला आवडत्या कलाकारांना भेटणे सोपे झाले आहे. मात्र अशाच एका फॅन्सचा अभिनेता संग्राम समेळला मात्र मनस्ताप झाला आहे. संग्रामने सोशल मीडियाच्या माध्यमातून हा प्रकार सगळ्यांसमोर आणला आहे. एका चाहतीच्या सततत्या मेसेजमुळे संग्रामला मनस्ताप सहन करावा लागला आहे.

View this post on Instagram

#throwback #muchneeded #holiday #love #us

A post shared by Sangram Samel (@sangramsamel) on

- Advertisement -

संग्रामने या प्रकाराचा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. संग्रामनं त्याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियाद्वारे पोस्ट केला आहे. स्वीटी सातारकर नामक तरुणी संग्रामला सतत मेसेज पाठवत आहे. दिवसभरात तिच्याकडून येणाऱ्या तीनशे ते चारशे मेसेजसमुळे संग्राम हैराण झाला आहे. तिच्यापुढे हतबल झालो असून, खासगी आणि वैवाहिक आयुष्यात अडचणी निर्माण होत आहेत. अशा प्रकारे वागणे योग्य नाही. तिचे पालक परिचयात असल्यास त्यांच्यापर्यंत हा संदेश पोहोचावा, असं संग्रामनं व्हिडिओत म्हटलं आहे. रंगभूमी, मालिका आणि चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेला अभिनेता संग्राम समेळ अडचणीत सापडला आहे. त्याला एक चाहती सतत मेसेज करत असून, त्यामुळे संग्रामला मनस्ताप सहन करावा लागत आहे.

- Advertisement -

संग्रामने ललित २०५ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला. केवळ मालिका नाही तर रंगभमीवर देखील संग्रामने आपला ठसा उमटवला आहे. सध्या रंगभूमीवर कुसूम मनोहर लेले हे नाटक सुरू आहे. या आधी एकच प्याला या नाटकात सुधाकरची भुमिका केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -