घरमनोरंजनअभिनेता संतोष जुवेकर विरोधात गुन्हा दाखल

अभिनेता संतोष जुवेकर विरोधात गुन्हा दाखल

Subscribe

दहीहंडी उत्सवात नियमांचे उल्लघन केल्याप्रकरणी अभिनेता संतोष जुवेकर याच्या विरोधात पुण्यातील सहकार नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दहीहंडी उत्सवात नियमांचे उल्लघन केल्याप्रकरणी अभिनेता संतोष जुवेकर याच्या विरोधात पुण्यातील सहकार नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भररस्त्यात दहीहंडीचं आयोजन करून रहदारीला अडथळा निर्माण करण्याचा आरोप करत हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मात्र दहीहंडीच्या उत्सवासाठी आपण पुण्यात उपस्थित नसल्याचं संतोष जुवेकरने म्हटलं आहे. दहीहंडीच्या दिवशी आपण पुण्याला गेलोच नव्हतो, असं संतोष जुवेकरने प्रतिक्रिया देताना सांगितलं. या मंडळाकडून मला आमंत्रणही देण्यात आलं नव्हतं. त्या दिवशी मी दिवसभर ठाण्यातील माझ्या घरी होतो. मंडळाने परवानगीशिवाय बॅनरवर माझा फोटो वापरला. त्यामुळे हा फोटो पाहून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल करण्यापूर्वी पोलिसांनी किमान शहानिशा तरी करायला हवी होती, असं संतोषनं म्हटलं आहे.

माझ्या बरोबर एक गम्मत घडली पुण्यात, मी तिकडे नसताना. हे सगळ छापण्या आधी ह्या पत्रकार महोदयांनी माझ्याशी का नाही बोलण केल? उगाच हलक्या कानाने आणि थोड्याशा फुटकळ प्रसिध्दी साठी उगाच कुणाचं नाव आणि त्याची इब्रत वेशीला टांगु नका, ही विनंती. अभिनेता संतोष जुवेकरविरुध्द गुन्हा दाखल http://www.dainikprabhat.com/अभिनेता-संतोष-जुवेकरविरु/ Mandar Phanse Ashwini Ranjeet Darekar पुण्यातील रहदारी आणि ध्वनिप्रदूषण प्रकरणी ,पुणे वाहतूक पोलीस शाखेने माझ्यावर गुन्हा नोंदवल्याची हेडलाईन ऐका दैनिकाने छापली. ही बातमी म्हणजे लवकरच मी एक या स्टोरी वर सिनेमा बनवणार आहे. फक्त मी पोलीस होऊ? कि पत्रकार ? जे माझे नेहेमीच हिरो असतात, पण या मुळे एक समजलं की या दोन्ही पैकी कुणीच खात्री न करता माझ्यावर गुन्हा टाकला. मी जिथे गेलोच नाही, मी जिथे कुठला करार केला नाही, तो मी नव्हेच असं ही काही नाही, तरीही ? तरीही? नको “मी संतोष जुवेकर” म्हणूनच ठीक आहे. लवकरच या बाबत मी पुणे वाहतूक पोलिसांना वकीला मार्फत माझं म्हणणं कळवेन, बरं मी काही नंबरकारी गुन्हेगार नाही हो, की मी फरार आहे, तपास सुरू आहे, हा शुद्ध बालीशपणा किमान पोलीस आणि पत्रकार का टाळू शकत नाहीत? माझ्या असंख्य मित्र मैत्रिणींची सारखी काळजी पोटी चौकशी माझ्याकडे सुरू आहे, तर मित्रो …..छे ,रहदारी आणि ध्वनीप्रदूषण चं हे दूषण मला हास्यास्पद वाटत आहे….आज रहदारी आणि ध्वनिप्रदूषण पासून सर्वांची माझ्या सकट आणि वाहतूक पोलिसां सकट मुक्तता होवो , हे साकडं गण नायकाच्या चरणी घालतो …चला खूप कामं आहेत आपल्याला…??

A post shared by Santosh Juvekar (@santoshjuvekar12) on

- Advertisement -

काय आहे हे प्रकरण

सोमवारी पुण्यातील सहकार नगर परिसरात अरण्‍येश्‍वर दहीहंडी उत्‍सव मंडळातर्फे दहीहंडी उभारण्‍यात आली होती. या कार्यक्रमात संतोष जुवेकरही सहभागी झाला होता. रस्‍त्‍याच्‍या मधोमध ही हंडी उभारण्यात आली होती. यामुळे चौकात तसेच आजूबाजूच्‍या रस्‍त्‍यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. तेथील नागरीकांना याचा प्रचंड त्रास झाला. यावेळी मोठ्या आवाजात डॉल्‍बी साऊंड लावून ध्‍वनीप्रदुषण कायद्याचेही उल्‍लघंन करण्‍यात आल्याचे मत तेथील रहिवाशांनी व्यक्त केले. पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेत कार्यक्रम बंद करण्‍याची विनंती आयोजकांना केली होती. मात्र आयोजकांनी ती धुडकावून लावली. त्यामुळे आयोजकांच्या विरोधात सहकार नगर पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.

ध्वनीप्रदुषणाचाही आरोप

याच दहीहंडी उत्सवाला अभिनेता संतोष जुवेकर प्रमुख पाहुणा म्हणून गेला होत. पंचवीस बाय वीस लांब रस्त्यात ही हंडी उभारण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण रस्ता रोखला गेला. त्यामुळे या परिसरात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. त्याचा पुणेकरानाही मोठा फटका बसला होता. या शिवाय दहीहंडीवेळी प्रमाणापेक्षा मोठ्या आवाजात डॉल्बी लावल्यामुळे ध्वनीप्रदूषण झाल्याचे मतं तक्रारीत नोंदवण्यात आले. पोलिसांनीही याची दखल घेत आयोजकांना कार्यक्रम बंद करण्यास सांगितलं होतं. परंतु दहीहंडीच्या आयोजकांनी त्याला विरोध करून शासकीय कामात अडथळा आणल्याचं समजतं. परिणाणी सहकार नगर पोलिसांनी अभिनेता संतोष जुवेकरसह चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -