घरताज्या घडामोडी‘चला हवा येऊ द्या’मध्ये स्वप्निल जोशीची एंट्री, आता थुकरटवाडीत होणार धमाल!

‘चला हवा येऊ द्या’मध्ये स्वप्निल जोशीची एंट्री, आता थुकरटवाडीत होणार धमाल!

Subscribe

गेली सहा वर्षे महाराष्ट्रातील प्रेक्षकांना ‘चला हवा येऊ द्या’ खळखळून हसवत आहे. घराघरातील तो एक लोकप्रिय शो झाला आहे. या आपल्या कार्यक्रमाची रंगत आणखी वाढणार आहे ती या शोमधील स्वप्निल जोशी यांच्या प्रवेशाने. स्वप्निल जोशी या कार्यक्रमात सिंहासनाधिष्ट होणार असून व्यासपीठाच्या समोर बसून यातील कलाकारांचे मितवा, मार्गदर्शक, सहआध्याई बनून सहभागी होणार आहेत.

दिवाळीच्या निमित्ताने ‘चला हवा येऊ द्या’मध्ये एक नवा अध्याय आकाराला येतोय. थुकरटवाडीतील हे कलाकार एका भव्य वास्तूमध्ये वास्तव्याला आहेत. ही जागा आहे एका जुन्या राजाची, महाराजा प्रदीप सिंग ऊर्फ बच्चू जोशी यांची. ते ५०० वर्षांपूर्वीच निवर्तले आहेत, पण त्यांच्या या पवित्र आणि प्रिय वास्तूशी थुकरटवाडीचे लोक छेडछाड करतात आणि त्या रागातून राजाचा आत्मा तेथे अवतीर्ण होतो. या सर्व थुकरटवाडीकरांना बंदी बनवतो आणि राजाला हसवण्याची, त्याचे मनोरंजन करण्याची शिक्षा देतो आणि मग खळाळत्या मनोरंजनाला, धमाल माहोल निर्माण व्हायला सुरुवात होते. अर्थातच हा माहोल ‘चला हवा येऊ द्या’च्या प्रेक्षकांना या दिवाळीत अनुभवता येणार आहे.

- Advertisement -

‘चला हवा येऊ द्या’च्या निर्मात्यांनी एक वेगळा प्रयोग यावेळी दिवाळीत केला आहे. यातील कलाकार ७ दिवस एका भव्य फार्महाऊसवर राहणार आहेत. तेथे ते धमाल करणार आहेत आणि तिच या दिवाळीत रसिकांसमोर येणार आहे.

हसविण्याच्या या नवीन संकल्पामध्ये स्वप्निल जोशी अर्थातच राजाच्या भूमिकेत असणार आहेत. समोरच्या सिंहासनावर बसून तो या मनोरंजनाचा आनंद घेणार आहेत आणि त्यात सहभागीही होणार आहेत. स्वप्निल जोशी या कार्यक्रमात एक कलाकार मान्यवर म्हणून अनेकवेळा आला आहे. त्याला या कार्यक्रमात येणे मनापासून आवडते आणि तो आला की थुकरटवाडीतसुद्धा एक माहोल निर्माण होतो. या नवीन संकल्पामुळे आता तोच या थुकारटवाडीचा एक भाग झाला आहे. त्यामुळे हा माहोल कायम राहणार आहे.

- Advertisement -

“चला हवा येऊ द्या’चा मंच माझ्यासाठी नवीन नाही. मी येथे अनेकदा आलो तर आहेच पण त्याचबरोबर यातील कलाकारांशी माझा परिचय फार जुना आहे. भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेयाबुगडेहे सर्व ‘फू बाई फू’ कार्यक्रमातून पुढे आले आहेत, तर निलेश साबळे त्या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक होता. त्यांचाप्रवास मी तेव्हापासून अनुभवतोय. त्या सर्वांचा मी चाहता आहे. या नवीन प्रयोगाच्या माध्यमातून मी त्यांचा मितवा म्हणून कार्यक्रमात सहभागी होतो आहे. त्यामुळे आता मला या आवडत्या कार्यक्रमात सातत्याने सहभागी होता येईल, समोर बसून त्यांचा आविष्कार पाहता येईल, कलाकारांना दाद देता येईल. या कलाकारांना कोपरखळी मारता येईल, त्यांची गम्मत करता येतील, त्यांच्याकडून करून घेता येईल. त्याद्वारे या कार्यक्रमात येणाऱ्या पाहुण्यांनाही कम्फर्टेबल करता येईल,” स्वप्निल जोशी म्हणाला.

स्वप्निल जोशी पुढे म्हणला की, या कार्यक्रमात सहभागी होणे ही त्यांच्यासाठी ‘विन-विन’ अशी परिस्थिती आहे. “मला या कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी हक्काने, प्रेमाने बोलावले आहे. मलाही खळखळून हसता येईल, मानसिक ताण कमी होईल. त्याहून महत्वाचे म्हणजे माझ्या चाहत्यांशी या माध्यमातून कनेक्ट होता येईल. त्यामुळेही या कार्यक्रमाचा वेगळा आनंद मला आहे,” ते म्हणतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -