सिंबामध्ये दिसणार हे मराठी कलाकार!

गेल्या अनेक दिवसांपासून ज्या चित्रपटाची चर्चा आहे, असा रोहीत शेट्टीचा अगामी सिनेमा 'सिंबा'चं शूट सुरू झालं आहे. या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग प्रमुख भूमिकेत आहे. तर रणवीर बरोबर अभिनेत्री सारा अली खान दिसणार आहे.

mumbai
simba
रणवीर सिंग

गेल्या अनेक दिवसांपासून ज्या चित्रपटाची चर्चा आहे, असा हा रोहीत शेट्टीचा अगामी सिनेमा ‘सिंबा’चं शूट सुरू झालं आहे. सध्या मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार आता हिंदी चित्रपटात अगदी सहज दिसतात. त्याचप्रमाणे सिंबामध्येही अनेक मराठी कलाकार प्रेक्षकांना भेटणार आहेत. यात महत्त्वाच्या भूमिकेत हे मराठी कलाकार दिसतील.

या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग प्रमुख भूमिकेत आहे. तर रणवीर बरोबर अभिनेत्री सारा खान दिसणार आहे. या चित्रपटात कोण कोण मराठी कलाकार असतील याची उत्सुकता आता संपली आहे. कारण अभिनेता सौरभ गोखलेने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. ज्या फोटोत अनेक मराठी कलाकार दिसत आहेत. हा फोटो शेअर करताना सौरभने लिहिलं आहे. ‘सिंबाचं शुटींग पुन्हा सुरू’!

Marathi Actor
हे मराठी कलाकार दिसणार ‘सिम्बा’ मध्ये

सौरभने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये सिद्धार्थ जाधव, विजय पाटकर, नंदू माधव हे कलाकार दिसत आहेत. या चित्रपटात रणवीर सिंग एक मराठी पोलीस अधिकारी म्हणजेच संग्राम भालेरावच्या भूमिकेत दिसणार आहे. रणवीरला अनेक मराठी कलाकार सेटवर असण्याचा नक्कीच फायदा होईल यात शंका नाही.

‘सिंबा’ सिनेमाचे दिग्दर्शन रोहीत शेट्टी करणार आहे. तर ‘सिंबा’ हा सिनेमा तेलुगू चित्रपट ‘टेंपर’चा रीमेक आहे. चित्रपट तेलुगू चित्रपटाचा रिमेक जरी असला तरी या चित्रपटाला बॉलिवूड टच देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सारा अली खानचा सिम्बा हा पहिलाच चित्रपट असल्यामुळे प्रेक्षकांना उत्सुकता आहे. २८ डिसेंबरला सिंबा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here