धनश्री म्हणतेय कुणीतरी येणार गं…!

धनश्रीच्या घरी लवकरच छोट्या पाहुण्याचे आगमन.

Marathi Actress dhanashree kadgaonkar is Pregnant
धनश्री म्हणतेय कुणीतरी येणार गं...!

‘तुझ्यात जिव रंगला’ या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री ‘धनश्री काडगावकर’ म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी वहिनीसाहेब. मात्र आता वहिनीसाहेब फक्त वहिनीसाहेब राहिल्या नाहित तर त्या आईसाहेब होणार आहेत. धनश्रीने आपल्या गरदोरपणाची बातमी सोशल मीडियावरून दिली आहे. धनश्रीचा नवरा दुर्गेश देशमुख याच्या वाढदिवसानिमित्त धनश्रीने तिच्या इनस्टाग्राम अकाउंट वरून एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे.धनश्री आणि दुर्वेशच्या घरी आता नव्या पाहुण्याच आगमन होणार आहे.


दुर्वेशच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हि गोड बातमी धनश्रीने तिच्या चाहत्यांना दिली आहे.व्हिडीओतून आपण आई- बाबा होणार असल्याचं त्यांनी अनाउन्स केलं आहे. धनश्री आणि दुर्वेशने साउथ इंडियन लुक मध्ये दिसत आहेत. बाळाच्या येण्याची चाहुल लागल्यावर एका स्रीच्या आयुष्यात जे बदल घडतात ते बदल व्हिडीओतून दाखवले आहेत.व्हिडीओत धनश्रीने हिरव्या रंगाची साडी नेसली आहे तर दुर्वेश हि साऊथ इंडियन लुक मध्ये दिसून येतोय. झुल्यावर झुलणारी , चिंचा, आवळा खाणारी धनश्री या व्हिडीओत खुपच सुंदर आणि सोज्वळ दिसत आहे.

धनश्रीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हयरल होतोय. छोट्या पाहुण्याच्या आगमनाच्या बातीमीने धनश्रीच्या चाहत्यांनी चाहत्यांनी तिचं खुप कौतुक केलं आहे. तिच्या नवीन जीवनासाठी आणि येणाऱ्या नव्या पाहुण्याला अनेक आशिर्वाद आणि शुभेच्छाही दिल्या आहेत. छोट्या पडद्यावर वहिनीसाहेब म्हणून धनश्रीने कायमच प्रेक्षाकांच्या मनावर राज्य केलं. तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून धनश्री महाराष्ट्रातल्या घराघरात पोहचली. माझिया प्रियाला प्रित कळेना या मालिकेतून धनश्रीने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. गंध फुलांचा गेला सांगून या मालिकेत धनश्री मुख्य नायिकेच्या भुमिकेत प्रेक्षकांसमोर आली होती.


हेहि वाचा – लॉकडाऊन नंतर पहिल्यांदाच शितली करतेय आउटडोर शूट