घरताज्या घडामोडीअभिनेत्री मेघा घाडगेच्या फेसबुक पोस्टवर अश्लील कमेंट, पोलिसांत तक्रार दाखल

अभिनेत्री मेघा घाडगेच्या फेसबुक पोस्टवर अश्लील कमेंट, पोलिसांत तक्रार दाखल

Subscribe

मीरारोड येथे राहणार्‍या मराठी अभिनेत्री नृत्यांगना मेघा घाडगे हिच्या फेसबुक पोस्टवर अश्लील भाषेत कमेंट केल्याची घटना समोर आली आहे. या अगोदर देखील सोशल मीडियावर अभिनेत्रींच्या फोटो आणि व्हिडिओवर अश्लील कमेंट देण्याच्या घटना घडल्या आहेत. पुन्हा एकदा अशाचा प्रकराची घटना मेघा घाडगेसोबत घडली आहे. मेघाने या प्रकरणी नयानगर पोलीस ठाण्यात या तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामुळे आता पुन्हा एकदा मराठी चित्रपटसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे.

मेघाने मराठी चित्रपटाच्या लावणीचे शूटिंग करत असतानाचा सहकलाकारासोबतचा फोटो फेसबुक अकाऊंटवर पोस्ट केला होता. तिने त्यानंतर मोबाईल तपासला असता पोस्ट केलेल्या फोटोवर अश्लील कमेंट आल्या होत्या. त्यात सरूप पांडा नावाच्या अनोळखी व्यक्तीने फोटोवर अश्लील शेरेबाजी केली असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी पोलिसांनी सरुप पांडा नावाच्या इसमावर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या घटनेनंतर आरोपी पांडा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

- Advertisement -

दरम्यान, मेघा घाडगे ही नयानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास गेली होती. त्यावेळेस पोलिसांनी तिला अर्धा ते एक तास बसवून ठेवले. तसेच तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप तिने केला आहे. तक्रार दाखल करून घेण्यास वेळकाढूपणा केला. कलाकाराला पोलीस अशी वागणूक देत असतील तर सामान्य माणसाची अशीच परिस्थिती असेल अशा शब्दात मेघा घाडगेने पोलिसांविरोधात आपली नाराजी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

फेसबुकच्या फोटोवर आलेल्या अश्लील कमेंटवर अभिनेत्री नृत्यांगना मेघा घाडगे म्हणाली…

फेसबुकच्या फोटोवर आलेल्या अश्लील कमेंटवर अभिनेत्री नृत्यांगना मेघा घाडगे म्हणाली…

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ಫೆಬ್ರವರಿ 24, 2020


हेही वाचा – बीग बींच्या मराठी सिनेमाचा टीझर प्रदर्शित, पाहा व्हिडिओ!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -