अभिनेत्री पल्लवी पाटील पहिल्यांदाच डेली सोपमध्ये

marathi actress pallavi patil coming soon on television in Jigarbaaz
अभिनेत्री पल्लवी पाटील पहिल्यांदाच डेली सोपमध्ये

सोनी मराठी वाहिनीवर ११ नोव्हेंबर पासून नवीन मालिका ‘जिगरबाज’ सुरू होते आहे. सत्ता विरुद्ध सत्य असा संघर्ष या मालिकेत पाहायला मिळेल. या मालिकेत प्रतीक्षा लोणकर, अरुण नलावडे असे दिग्गज कलाकारही असणार आहेत याबरोबरच एक ओळखीचा आणि ग्लॅमरस चेहराही या मालिकेत असणार आहे. तो म्हणजे पल्लवी पाटील या अभिनेत्रीचा. पल्लवीला प्रेक्षकांनी अनेक चित्रपटांमध्ये पाहिलं आहे. ‘जिगरबाज’ ही पल्लवीची पहिलीच मालिका आहे. डॉ. सुहानी गायकवाड ही व्यक्तिरेखा पल्लवी या मालिकेत साकारणार आहे. ‘जिगरबाज’ ही एका हॉस्पिटलची गोष्ट आहे.

दरम्यान पल्लवी ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिने गेल्या काही दिवसांपासून शेअर केलेले तिचे बरेच फोटो चांगलेच चर्चेत आले आहेत. आता देखील तिने शेअर केलेले हे फोटो व्हायरल झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

🖤

A post shared by Pallavi Patil (@officialpallavipatil) on

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तिने ‘क्लासमेटस्’, ‘शेंटीमेंटल’, ‘सविता दामोदर परांजपे’, ‘बॉइज-२’, ‘तू तिथे असावे’ या चित्रपटातून पल्लवी पाटील ही दिसली होती. त्यानंतर तिने वेबसीरिज दुनियेत पदार्पण केले. ‘गोंद्या आला रे’ या वेबसीरिमधून पल्लवी प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. मग ती ‘ट्रिपल सीट’ या चित्रपट अभिनेता अकुंश चौधरीसोबत दिसली होती. आता ती ‘जिगरबाज’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.