घरमनोरंजनप्राजक्ता माळीचं चाहत्यांना अवाहन!

प्राजक्ता माळीचं चाहत्यांना अवाहन!

Subscribe

गणपती विसर्जनानंतर आता स्वच्छता मोहिमेचं काम हाती घेण्यात आलं आहे. या कामात कलाकारांनी पुढाकार घेतलाय. प्राजक्ता माळीने सोशल मीडियावरून या मोहिमेत सहभागी होण्याचं अवाहन केलं आहे.

मुंबई असो वा पुणे, दरवर्षीप्रमाणे यंदाही दोन्ही ठिकाणी गणपती विसर्जन मोठ्या जल्लोषात पार पडलं. गणपती बाप्पा तर गेले, पण समुद्राकाठी विसर्जनानंतर राहिलेल्या निर्माल्य आणि इतर साहित्याचं काय? गणपती विसर्जनानंतर या कार्यासाठी अनेक सार्वजनिक संस्था पुढे आल्या. त्यांनी स्वच्छता मोहीम राबवली. अशा मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन आता कलाकार मंडळींकडून देखील केलं जातंय. तर काही कलाकारच या मोहिमेत सहभाग घेताना दिसत आहेत.

अभिनेत्री प्राजक्ता माळीने आपच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत ती तिच्या चाहत्यांना स्वच्छता मोहिमेत सामील होण्याचं आवाहन करत आहे. ‘थोडासा वेळ काढून स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हा, पुण्यातील रस्त्त्यांवर उतरून स्वच्छता करा. गेल्या वर्षी ज्या प्रमाणे सहकार्य केलं. त्याचप्रमाणे या वर्षीपण या मोहिमेत सहभागी व्हा’, असं म्हणत प्राजक्ताने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

- Advertisement -

तर व्हायाकॉम १८ तर्फे मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांवर राबवण्यात आलेल्या मोहिमेत अभिनेत्री अर्चना निपाणकरनेही सहभाग घेतला. यावेळी तिच्याबरोबर ७०० स्वयंसेवक होते. या सगळ्यांनी मिळून मुंबईतील समुद्र किनारे स्वच्छ केले.

cleaning campaigning
स्वच्छता मोहीम
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -