घरमनोरंजनकथ्थक नृत्याची 'समृद्धी' प्रेक्षकांच्या पसंतीस

कथ्थक नृत्याची ‘समृद्धी’ प्रेक्षकांच्या पसंतीस

Subscribe

'लक्ष्मी सदैव मंगलम' मालिकेतील लक्ष्मी अर्थात समृध्दी केळकर ही विशारद पूर्णच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाली आहे. 'लक्ष्मी सदैव मंगलम' मालिकेतून लक्ष्मी सर्वांच्या घराघरामध्ये पोहोचली आहे.

छोट्या पडद्यावर ‘लक्ष्मी सदैव मंगलम’ मालिकेतून घराघरात पोहोचलेला चेहरा म्हणजे लक्ष्मी अर्थात समृध्दी केळकर. ‘लक्ष्मी सदैव मंगलम्’ मालिकेमधील लक्ष्मी खूप कमी दिवसात प्रेक्षकांची लाडकी झाली आहे. तिच्या निरागस अभिनयाने तिच्या चाहत्यामध्ये चांगलीच वाढ झाली आहे. लक्ष्मीची भूमिका साकारणाऱ्या समृद्धीने अवघ्या कमी वेळात प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. आता समृद्धी केळकर विशारद पूर्णच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाली आहे.

Samruddhi kelkarसमृद्धी नृत्याचे धडे गिरवते

‘लक्ष्मी सदैव मंगलम्’ मालिकेमधील तिची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडते आहे. सगळ्यांची लाडकी समृध्दी अभिनयाबरोबर नृत्याचे देखील धडे घेत आहे. समृद्धी लहानपणापासून कथ्थकचे शिक्षण घेत आहे. ठाण्यामधील नुपूर नृत्यालयाच्या संचालिका नृत्यालंकार निवेदिता रानडे यांच्याकडून नृत्याचे धडे गिरवत आहे. सध्या समृद्धी शुटींग सांभाळून तिची ही आवड देखील उत्तमरीत्या जोपासत आहे. कथ्थक बरोबरच समृद्धी लावणी, हिप हॉप, बॉलीवूड, वेस्टर्न याप्रकारचे नृत्य देखील लीना भोसले शेलार यांच्याकडून शिकत आहे.

- Advertisement -

माझी नृत्याची आवड बघून आईने मला लहानपणीचं कथ्थक शिकण्यासाठी निवेदिता रानडे यांचे क्लासेस सुरु केले. गेल्या १३-१४ वर्षांपासून किंबहुना त्याहून जास्त वर्षांपासून मी कथ्थक शिकत आहे. मी अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयातर्फे कथ्थकच्या परीक्षा देत होते. यावर्षी मी विशारद पूर्ण झाले असून मला डिस्टीनक्शन मिळाले आहे त्यामुळे मला याचा खूप आनंद झाला आहे. कथ्थकच्या परीक्षा खूप कठीण असतात, जवळपास सहा तास या परीक्षा सुरु असतात. कथ्थक शिकण्याचा फायदा आज मला लक्ष्मी सदैव मंगलम् या मालिकेमध्ये अभिनय करताना देखील होत आहे.  – समृध्दी केळकर, अभिनेत्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -