खंडणीप्रकरणी अभिनेत्री सारा श्रवण हिला अटक

अभिनेत्री सारा श्रवण हिने एका नवोदित अभिनेत्याला धमकी देऊन खंडणी उकळली आणि दुबईला पळ काढला.

Mumbai
marathi actress sara shrawan arrested in extortion case
अभिनेत्री सारा श्रवण

झी मराठीवरील ‘पिंजरा’ या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री सारा श्रवण हिला खंडणी उकल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी तिला रात्री मुंबईतून गुन्हे शाखा यूनिट दोनने अटक केली. अटक केल्यानंतर तिला शिवाजी नगर न्यायालयामध्ये पोलिसांनी हजर केलं. मात्र तिला जामीनवर सुटका केल्याचं वृत्त समोर आलं आहे.

नक्की काय घडलं?

आरोपी अभिनेत्री सारा श्रवण हिने ‘रोल नंबर १८’ या चित्रपटातील अभिनेत्याविरोधात विनयभंगाची खोटी तक्रार दाखल केली होती. तसंच याप्रकरणात तिला ‘रोल नंबर १८’ मधील अभिनेत्री रोहिणी मच्छिंद्र माने देखील माने मदत करत होती. ‘रोल नंबर १८’ या चित्रपटामधील नवोदित अभिनेत्याला धमकी देत तिने खंडणी उकळली. या धमकी दिलेल्या अभिनेत्याचं नाव सुभाष दत्तात्रय यादव असं आहे. त्याने दिलेल्या तक्रारीवरून साराविरोधात सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यानंतर तिला याप्रकरणी रात्री मुंबईमधून अटक करण्यात आली. गेले कित्येक दिवस ती दुबईला गेली होती. मात्र ती मुंबईत येताच क्षणी तिला अटक केली. तिला मदत करणाऱ्या अभिनेत्री रोहिणी मच्छिंद्र माने, दहशतवाद विरोधी पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमोल विष्णू टेकाळे आणि राम जगदाळे यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.

न्यायालयाने गुन्हा गंभीर असल्यामुळे तिने दाखल केलेला अटकपूर्व जामीन फेटाळला होता. तक्रारदारच्या वतीने अॅड. मिलिंद पवार आणि अॅड. अजय ताकवणे यांनी अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध केला होता.


हेही वाचा – Video: सनी लिओनीचं ‘हॅलो जी’ गाणं व्हायरल