मराठी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत दुसऱ्यांदा अडकली विवाहबंधनात

बिग बॉस मराठीतील अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई विवाहबंधनात अडकले आहेत. मागील काही दिवसांपासून या दोघांच्या लग्नाबाबत जोरदार चर्चा सुरु होती. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नसमारंभाचे फोटोही व्हायरल झाले होते. अखेर शर्मिष्ठाचा विवाहसोहळा पार पडला आहे. आपल्या या लग्नसोहळ्याचे फोटो शर्मिष्ठाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.