घरमनोरंजन'बेताल' वेब सीरिजमध्ये मराठी कलाकारांचा डंका!

‘बेताल’ वेब सीरिजमध्ये मराठी कलाकारांचा डंका!

Subscribe

वेबसीरिजच्या भाऊगर्दीत आणखी एका नव्या सीरिजची भर पडली आहे. २४ मे रोजी नेटफ्लिक्सवर बेताल ही वेब सीरिज प्रदर्शित झाली असून दोनच दिवसांत या सीरिजचा नेटकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. बॉलीवूड किंग शाहरुख खान यांच्या रेड चिली कंपनीने निर्मिती केलेली या वेबसीरिजमध्ये अभिनेता विनित कुमार मुख्य भूमिकेत असला तरीही मराठी कलाकारांनी आपली वेगळी छाप बेतालमध्ये पाडल्याचे पाहायला मिळते. सेक्रेड गेम्समध्ये हवालदार काटेकरच्या भूमिकेत अपार यश मिळवणारे अभिनेता जितेंद्र जोशी बेतालमध्ये पुन्हा एकदा वेगळ्या भूमिकेत दिसत आहेत. तर चॉकलेट बॉय अभिनेता सिद्धार्थ मेनन आणि अभिनेत्री मंजिरी पुलाला यांच्याही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या लक्षात राहतील, अशा त्यांनी वठवल्या आहेत. विशेष म्हणजे बेतालचे दिग्दर्शन पत्रिक ग्रहमसोबत मराठमोळे दिग्दर्शक निखिल महाजन यांनी केले आहे. त्यामुळे हिंदी वेबसीरिजमध्ये पुन्हा एकदा मराठी कलाकारांचा दमदार अभिनय पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

जितू, सिद्धार्थ, मंजिरी यांच्या हटके व्यक्तिरेखा 

शाहरुख खानच्या रेड चिलीजने अमेरिकन निर्माता जेसन ब्लमची कंपनी ब्लूमहाऊस प्रॉडक्शन यांच्याशी करार करून नेटफ्लिक्स ऑरिजनल वेब सीरीज बेताल वेब सीरिजची निर्मिती केली. या वेब सीरिजची स्ट्रीमिंग २४ मे पासून नेटफ्लिक्सवर सुरू झाले आहे. सीरिजमध्ये आर्मी ही झोम्बीशी झुंज देत असून एका गावाची कहाणी यात दाखवण्यात आली आहे. ब्रिटीश इंडियन आर्मी ऑफिसर बेताल आणि त्याची रेडकोट झोम्बी बटालियन या गावात दहशत निर्माण झाली आहे. दरम्यान, भारतीय पोलीस दल आणि लष्कर ग्रामस्थांच्या मदतीसाठी पुढे आले असून भूतांशी लढताना पाहायला मिळतात. जितेंद्र जोशी याने बेतालमध्ये लोभी, पैशासाठी वाट्टेल ते करणारा बिल्डर अजय मुधालवन यांची भूमिका साकारली आहे. तर सिद्धार्थ मेनन तरुण आर्मी ऑफिसर नादिर हकच्या भूमिकते दिसत आहे. मंजिरी पुलाला हिने गावातील आदिवासी महिलेची व्यक्तिरेखा साकारली आहे. तर यापूर्वी पुणे ५२ आणि बाजी चित्रपटाचे दिग्दर्शन केलेल्या निखील महाजन यांनी सहदिग्दर्शकाची जबाबदारी पार पाडली आहे.

हेही वाचा –

लॉकडाऊनमध्ये सलमान खानचा नवा उद्योग; ‘फ्रेश’ सॅनिटायझर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -