घरमनोरंजन‘बिग बॉस’मध्ये पत्रकार परिषद रंगते तेव्हा!

‘बिग बॉस’मध्ये पत्रकार परिषद रंगते तेव्हा!

Subscribe

‘बिग बॉस’च्या घरामध्ये सदस्यांना आठवडाभरात घडलेल्या टास्कवर, झालेल्या वादांवर विकेंडच्या डावामध्ये महेश मांजरेकरांच्या प्रश्नांना उत्तरं द्यावी लागतात. पण कालच्या भागात त्यांना थेट पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरं जावं लागलं.. या पत्रकार परिषदेत स्पर्धकांना विचारलेले प्रश्न आणि दिलेले उत्तर वाचा सविस्तर फक्त माय महानगरवर

 


मेघा धाडे

मेघाचा पहिल्या दिवसापासून ‘बिग बॉस’च्या घरात असलेला वावर. तिची टास्क खेळण्याची पध्दत, तिची आणि सईची मैत्री काही प्रेक्षकांना आवडली. मात्र काही आठवड्यापासून मेघावर सतत आरोप होत आहेत. सई आणि पुष्करबरोबर अनेकवेळा भांडण होऊनदेखील मेघा त्यांच्याबरोबर का बोलते? खरी मेघा कशी आहे? असे अनेक प्रश्न मेघाला विचारले गेले. त्यावर उत्तर देताना मेघा म्हणाली, ‘मी ‘बिग बॉस’च्या घरात पिकनीक म्हणून नाही, तर जिंकायला आलेय. मी माझा टास्क प्रामाणिकपणे खेळते. हो, माझ्याकडून काही चुका होतात.त्या मला मान्य आहेत. मी इतर सदस्यांबद्दल जे चुकीचं बोलले ते केवळ रागाच्या भरात होतं. त्यांच्याबद्दल माझ्या मनात काही वाईट नाहीये. टास्कमध्ये जी मेघा धाडे दिसते ती खरी नाही, खरी मेघा धाडे ही खूप वेगळी आहे. सईवर माझं सगळ्यात जास्त प्रेम आहे, त्यामुळे तिच्याबद्दल मी कधी वाईट विचार करूच शकत नाही.’ पुष्कर तुझ्या आणि सईच्या मैत्रीच्या मधे आला आहे का? या प्रश्नाचं उत्तर देताना मेघा म्हणाली, ‘तो आमच्यामधे आला असं मी नाही म्हणणार.’ कारण जेवढी सई माझी मैत्रिण आहे तेवढाच पुष्करही माझा मित्र आहे. पण थोड्याफार प्रमाणात पुष्करच्या येण्याने माझ्या आणि सईच्या नात्यात फरक पडलाय. त्याचप्रमाणे शर्मिष्ठा हीदेखील माझी चांगली मैत्रिण झालीय.तिने या घरात आल्यापासून मला कायम सपोर्टच केलाय. आम्ही दोघींनी ठरवलंय की आपला टास्क एकीकडे आणि आपली मैत्री एकीकडे. मी हा ‘रिआलिटी शो’ जिंकायला आलोय. विजेतेपदाची ट्रॉफी हातात घेणं हे एकच सध्या माझं ध्येयआहे.’

- Advertisement -

अस्ताद काळे

अस्तादला मेघा धाडे आणि तिची टास्क खेळण्याची पध्दत, त्याचं मराठी भाषेवर असणारं प्रभुत्व आणि कार्यक्रमाबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले. सगळ्या प्रश्नांना अस्तादने आपल्या खास शैलीत उत्तरं दिली. मेघाच्या टास्कविषयी बोलताना अस्ताद म्हणाला,‘मेघा टास्क खूप मनापासून, जिद्दीने खेळते; पण अनेक चुका करते. जवळजवळ सगळ्या टास्कमध्ये तिने स्ट्रॅटेजीच्या नावाखाली अनेक नियम मोडलेत. मेघाची सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे ती तिच्या चुका स्विकारत नाही. ती एक चूक लपवायला असंख्य वेळा खोटं बोलत असते. ती या घरात येताना सगळा अभ्यास करून आलीय. त्यामुळे तिला सगळं आधीच माहिती असतं. सोबतच ती घरात कोणाशी प्रामाणिक नाहीये.स्वत:च्या ग्रुपशी देखील ती प्रामाणिकपणे वागली नाही. मराठी भाषेबद्दल बोलताना अस्ताद म्हणाला, ‘मी जे मराठी बोलतो त्याचं श्रेय माझ्या बाबांना आहे. घरातील सदस्यांमध्ये स्मिताचं मी कौतूक करेन. तिने आपल्या भाषेवर काम करायला सुरुवात केली आहे. ती आली त्यावेळी तिला मराठी फार चांगलं बोलता येत नव्हतं. पण ती आता मराठी शिकतेय आणि मराठीत बोलण्याचाच प्रयत्न करतेय. माझ्यावर अनेकवेळा आरोप केले गेले, की मला भाषेचा गर्व आहे. तर तसं नाहीये. मला भाषेचा अभिमान आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक वेगळा अस्ताद प्रेक्षकांसमोर आला आहे. मी खूप रागीट आहे; पण या कार्यक्रमामुळे बर्फाची लादी डोक्यावर ठेवून कसं वागायचं हे मी शिकलो. घरातून बाहेर पडल्यावर सगळ्यात आधी आई-बाबा आणि स्वप्नालीला भेटणार आहे. खूप लोकांना ‘सॉरी’ म्हणायचं राहून गेलंय ते म्हणायचं आहे.

 

- Advertisement -

पुष्कर जोग

पुष्कर या पर्वाचा पहिला फायनलिस्ट आहे. पुष्करला सई आणि पुष्करच्या नात्याबद्दल अनेक प्रश्न विचारले गेले. मेघाबद्दल विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना पुष्करची मेघावरची नाराजी स्पष्ट दिसत होती. मेघा कशी खोटं वागते, ती आपल्या ग्रुपशी कशी प्रामाणिक नाहीये, आपली चूक मेघा कधीच कशी मान्य करत नाही याची अनेक उदाहरणं पुष्करच्या बोलण्यातून सतत येत होती. पण त्याचबरोबर मेघा माणूस म्हणून किती चांगली आहे, ती कशी सगळ्यांची काळजी घेते हे पुष्करने सांगितलं. त्याचबरोबर त्याने मेघाला घरातून बाहेर पडल्यावर सगळ्यांशी प्रामणिकपणे वागण्याचा आणि स्वत:च्या चुका स्विकारण्याचा सल्लाही दिला. मेघा विरोधात बोलताना यावेळी पुष्कर मात्र भरभरून बोलला. त्याचप्रमाणे त्याचं आणि सईचं नातं कसं फ्रेंडली आहे, सई कशी जवळची मैत्रिण आहे, याविषयी सांगितलं. पण ‘लग्न नसतं झालं तर सई केवळ मैत्रिणच असती का’ या प्रश्नाला उत्तर देताना पुष्कर म्हणाला, ‘आता मला एक चांगली बायको आहे. एक मुलगी आहे. पण जर माझं लग्न झालं नसतं तर मी नक्कीच सईबद्दल विचार केला असता. या पुष्करच्या उत्तरामुळे एकप्रकारे पुष्करने आपल्या प्रेमाची कबुली दिली असं म्हणायला हरकत नाही. यावेळी पुष्करने वाईल्ड कार्ड एन्ट्री घेऊन घरात आलेल्या शर्मिष्ठाचं कौतूक केलं. त्याचबरोबर बिग बॉसच्या घरात राहणं कठीण आहे हेही तो बोलला.अस्तादसारखा मित्र घरात मिळाला हे पुष्करने आवर्जून नमूद केलं.

सई लोकूर

सई आणि मेघा, पुष्करची मैत्री. घरात सगळ्यात आळशी कोण आहे ? मेघाचं वागणं सईला पटतंय का? या पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सई म्हणाली, ‘बिग बॉसच्या घरात येणं ही माझ्यासाठी खूप मोठी संधी होती. त्याचा पुरेपूर फायदा मी घेतलाय. मी आणि मेघा खूप चांगल्या मैत्रिणी आहोत. पण मला मेघाच्या अनेक गोष्टी खटकतात. ती घरात सध्या जशी वागतेय ते मला अजिबात पटत नाही. ती टास्क करताना वाट्टेल ते करायला तयार असते. त्याचप्रमाणे ती पुष्करबद्दल रागाच्या भरात जे बोलली ते खूपच वैयक्तिक होतं. केलेल्या चुका जेव्हा ती स्विकारत नाही तेव्हा मला तिचा भयंकर राग येतो. या घरातून बाहेर पडताना घराचे दिवे आपण बंद करूयात असं आम्ही दोघी कायम म्हणायचो. पण जेव्हा वेळ आली तेव्हा तिने मला सिलेक्ट न करता शर्मिष्ठाला सिलेक्ट केलं. त्यावेळी मला खूप वाईट वाटलं. अस्ताद तुमच्या मागे ‘तुम्हाला बाहेर काम नाहीयेत म्हणून घरात आला आहात’ असं म्हणाला त्यावर काय वाटतं?या प्रश्नाला उत्तर देताना सई म्हणाली, ‘माझ्याकडे तीन वर्षे बाहेर काम नव्हतं हे खरं आहे.पण ‘बिग बॉस’ ही माझ्याकडे चालून आलेली खूप मोठी संधी मी मानते. पुष्करबरोबरचं रिलेशन हे ‘बिग बॉस’च्या घरात आल्यावर तयार झालं. पुष्कर हा माझ्या खूप जवळचा मित्र आहे. आम्ही दोघं घरातील प्रत्येक गोष्ट एकमेकांबरोबर शेअर करतो. आणि हो, पुष्करचं लग्न झालं नसतं तर तो माझ्यासाठी कधीच फक्त फ्रेंड नसता. घरातून बाहेर पडल्यावर खूप तास मला काळोखात झोपायचं आहे. इथे रात्रीही लाईट सुरू असतात. त्यामुळे झोप पूर्ण होत नाही.’

स्मिता गोंदकर

गेल्या आठवड्यात महेश मांजरेकर यांनी स्मिताचं एका कारणावरून खूप कौतूक केलं. ते कारण म्हणजे स्मिताने या नव्वदहून अधिक दिवसांच्या प्रवासात एकदाही कोणाबद्दल वाईट उद्गार काढले नाहीत. यावर स्मिता म्हणाली, ‘मुळात कोणाबद्दल वाईट बोलावं हा माझा स्वभाव नाही. मी बाहेर मित्रमैत्रिणींबरोबर असतानाही कोण कोणाबद्दल बोलत असेल तर ‘कृपया माझ्यासमोर याबद्दल बोलू नका’ असं मी त्यांना सांगते. त्यामुळे घरात आल्यावरही हाच नियम मी पाळला. मी खूप शांतताप्रिय मुलगी आहे. ‘घरात सगळ्यात फेक कोण आहे?’ असं विचारलं असता स्मिता म्हणाली, ‘या घरात सगळेच थोडंथोडं प्रसंगाप्रमाणे फेक वागतात. कोणा एकाचं नाव घेता येणार नाही.’ स्मिताने यावेळी मराठी भाषेविषयी होणारी अडचणही सांगितली. स्मिता म्हणाली, ‘माझं मराठी भाषेवर प्रेम आहे. पण मराठी बोलताना मला अनेक अडचणी येतात. अनेक शब्दांचे अर्थ मला पटकन कळत नाहीत त्यामुळे गैरसमज निर्माण होतो. पण हळूहळू मी मराठीवर काम करते आहे. यावेळी स्मिताने ‘बिकीनी घाल’ या आईने दिलेल्या सल्ल्यावरही स्पष्टीकरण दिले. ती म्हणाली,‘मी ज्या कपड्यात मोकळं वाटतं तेच कपडे घालणं पसंत करते. सुरुवातीला घरात आले तेव्हा बिकीनी घालू की नको असा संभ्रम निर्माण झाला होता. प्रेक्षक काय म्हणतील,असं वाटलं होतं. पण आईनेच परवानगी दिली म्हटल्यावर मी बिकीनी घालायला सुरुवात केली.

शर्मिष्ठा राऊत

घरात आल्यापासून शर्मिष्ठा मेघाच्या सांगण्यानुसार टास्क खेळते, असा आरोप सतत केला गेला. यावर उत्तर देताना शर्मिष्ठा म्हणाली, ‘मी घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली. त्यावेळी बाहेरून सगळं बघून आले होते. पण दीड तासात जे दाखवलं जातं आणि प्रत्यक्षात दिवसभर घरात जे घडतं त्यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. मी घरात येतानाच गुप्रची खूप मोठी फॅन होते. पण त्याचबरोबर हेही ठरवलं होतं की टास्क खेळताना खूप मनापासून खेळायचा. टास्कआधी जे डिस्कशन आमच्यात व्हायचं त्यावेळी अनेक कल्पना माझ्या मनात यायच्या.त्या मेघाच्या बोलण्याशी मिळत्या-जुळत्या असायच्या. त्यामुळे कदाचित बाहेर बघताना असं वाटत असेल की मी मेघाचं सगळं ऐकते. शर्मिष्ठाचं अस्तित्त्व घरात आल्यावर जाणवलं नाही. यावर शर्मिष्ठा म्हणाली, ‘मी घरात आले तेव्हा बर्‍यापैकी शांतता होती. त्यामुळे उगाच आरडाओरडा करण्यात, मागचं उकरून काढून भांडणं करण्यात अर्थ नव्हता. मेघाबद्दल शर्मिष्ठा म्हणाली, ‘आमच्यात तेवढं सामंजस्य आहे. आम्ही दोघीही खेळ आणि मैत्री वेगळी ठेवतो. त्यामुळे टास्कमध्ये जरी नॉमिनेट केलं तरी मला वाईट वाटत नाही. माझं या घरात कोणाशीच भांडण नाहीये; पण मेघा मला सगळ्यात जवळची आहे. मला हे सगळे कायम चिडवत असतात, की मला गरज काय होती घरात यायची. पण हो, खरंच घरात राहणं खूप कठीण आहे.

———————————-

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -