घरताज्या घडामोडीVideo: बिग बॉस मराठी फेम हिना पांचाळ करणार लग्न!

Video: बिग बॉस मराठी फेम हिना पांचाळ करणार लग्न!

Subscribe

बिग बॉस सिझन १३ नुकताच संपला असून आता कलर्स चॅनेलवर एक नवीन धमाकेदार शो सुरू होणार आहे. यामध्ये बिग बॉस सिझन १३ मधील फेम पारस छाब्रा आणि शहनाज गिल यांचं स्वयंवर होणार आहे. या शोच नाव ‘मुझसे शाही करोगे’ असं आहे. यामध्ये पारस छाब्रासोबत लग्न करण्यासाठी दोन मुलींची नावं समोर आली आहेत. एकीचं नाव संजना असून दुसरी ही मलायका अरोरासारखी हुबेहूब दिसणारी आणि बिग बॉस मराठी सिझन २ मधील फेम हिना पांचाळ आहे. त्यामुळे आता पारस छाब्राचे स्वयंवर पाहण्यात आणखी मज्जा येणार आहे. कलर्सने हिना आणि संजनाचा प्रोमो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओत पारस या दोघींना प्रश्न विचारताना दिसत आहे.

- Advertisement -

‘मुझसे शादी करोगे’ या शोचे सुत्रसंचालन अभिनेता मनिष पॉल करत आहे. जेव्हा मनीष पॉल हिना पांचाळला स्टेजवर बोलवतात. तेव्हा मस्त स्टाईमध्ये ती स्टेजवर एन्ट्री करते. त्यानंतर पारस छाब्रा हिना विचारतो, ‘तू इतकी हॉट आणि सेक्सी आहेस तर तुझ्या मागे मुलांची लाईन लागली असेल. मग फक्त आब्रराका डाबरा का?’ यावर हिना म्हणते, ‘माझ्यामागे खूप मुलं आहेत ही खरी गोष्ट आहे. पण मी हिना पांचाळ आहे. सगळ्या गोष्टी हटके करते.’

- Advertisement -

त्यानंतर हिना पारसाला प्रश्न विचारते. ‘तुझ्या हातावर आकांक्षाचा टॅटू आहे. त्यामुळे तू तिला रिलेशनशिपबाबत शब्द दिला आहेस का?’ यावर पारस हिना उत्तर देतो, ‘जर मी रिलेशनशिपमध्ये असतो तर मी इथे नसतो. आजकाल आपण हातावर कोणताही टॅटू काढू शकतो आणि तो नष्ट देखील करू शकतो. आता हा टॅटू नष्ट करून मी पुढे कोण? असं लिहिलं. या उत्तरावर हिना पांचाळ प्रभावित होते. त्यामुळे आता पारस नक्की कोणाच्या गळ्यात वरमाळा घालतो हे येत्या काळात कळेल.


हेही वाचा – दिव्या खोसला Oops Moment ची झाली शिकार; व्हिडिओ व्हायरल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -