घरमनोरंजनमराठी बिग बॉसच्या फिनालेत सहा स्पर्धक

मराठी बिग बॉसच्या फिनालेत सहा स्पर्धक

Subscribe

बिग बॉस मराठी येत्या २२ तारखेला ग्रॅन्ड फिनाले आहे. जसा जसा फिनाले जवळ येत आहे, तशी याबाबत लोकांची उत्सुकता शिगेला पोहचत आहे. त्यामुळे बिग बॉस मधून आज कोण जाणार याकडे सर्वांचे लक्ष होते. आज कोणता उमेदवार घरा बाहेर पडणार याचीच चर्चा सुरु होती. तसेच या सिजनच्या पहिल्या फायनल राऊंडला कोण पोहचत आहे याचाही निकाल लागणार होता. गेल्या आठवड्यात रेशम घराबाहेर पडली होती मात्र या आठवड्यात बिग बॉसने कोणालाही घराबाहेर काढले नाही. त्यामुळे ही सहाजण फिनालेपर्यंत पोहोचली आहेत. आस्ताद काळे,मेघा धाडे, सई लोकुर, पुष्कर जोग, शर्मिष्ठा राऊत, स्मिता गोंदकर सहाजण फायनलिस्ट यादीत पोहोचली आहेत. पहिल्या ऐपिसोड पासूनच बिग बॉसा लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे त्यामुळे पहिला मराठी बिग बॉस कोण जिंकणार आहे याकडे उत्सुकतेने बघितले जात आहे.

बिग बॉस ने घेतली फिरकी
बिग बॉसने यावेळी उमेदवारांची चागंलीच फिरकी घेतली. ‘सई चा घरातील प्रवास संपला’ अशी घोषणा बिग बॉसने केली. यानंतर सर्वांचीच रडा रड सुरु झाली होती. सईनेही घरा बाहेर पडण्याचे मन बनवले होते. मात्र काही वेळातच फिरकी घेत असल्याचे बिग बॉसने सांगितले आणि घरातल्यांचा जीव भांड्यात पडला.

- Advertisement -

घरात पत्रकार परिषद
बिग बॉसच्या घरात आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत पत्रकारांनी उमेदवारांना प्रश्न विचारले. उमेदवारांनीही त्यांना तिकक्याच रुचकर पद्धतीने उत्तरे दिलीत. हा भाग प्रेक्षकांना उद्या बघयला मिळणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -