Venice film festival मध्ये मराठी चित्रपटाचा झेंडा, पटकावले २ पुरस्कार!

chaitnya tamhne
चैतन्य ताम्हणे

व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदा मराठी चित्रपटाने बाजी मारली आहे. दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणेच्या ‘द डिसायपल’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट पटकथा लेखनाचा पुरस्कार मिळाला आहे. एखाद्या मराठी चित्रपटाने हा बहुमान पहिल्यांदाच मिळवला आहे.

१९३२ पासून सुरू असलेला व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा इतिहासातील सर्वात जुना आणि अत्यंत मानाचा चित्रपट महोत्सव म्हणून ओळखला जातो. या महोत्सवात तब्बल २० वर्षांनी एका भारतीय चित्रपटाची निवड झाली होती. या मराठी चित्रपटानं ‘इंटरनॅशनल क्रिटिक्स’ आणि ‘सर्वोत्कृष्ट पटकथा’ या दोन पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं. या कामगिरीसाठी ‘द डिसायपल’चा दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

कोर्ट ची चित्रपटसृष्टीवर छाप

कोर्ट या आपल्या पहिल्याच चित्रपटाच्या दिग्दर्शनातून चैतन्यनं चित्रपटसृष्टीवर आपली छाप सोडली होती. ‘द डिसायपल’ हा त्याचा चित्रपट व्हेनिस चित्रपट महोत्सवाच्या स्पर्धा विभागात दाखवण्यात आला. हा चित्रपट भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारित आहे. तसंच शास्त्रीय गायक आदित्य मोडक हे या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत.