घरमनोरंजनप्रेम असतं किंवा नसतं

प्रेम असतं किंवा नसतं

Subscribe

कवी, साहित्यिक, गीतकार या सर्वांनी प्रेमाची व्याख्या आपापल्या पद्धतीने मांडलेली आहे. प्रत्येक माणसानेही आपल्या पद्धतीने त्याचा विचार केलेला आहे. हे प्रेम मिळवण्यासाठी प्रत्येक कालखंडात वेगवेगळे मार्ग प्रेम करणार्‍यांना स्वीकारावे लागलेले आहेत. मैत्री, प्रेम, रोमान्स, भावना, समज-गैरसमज अशा टप्प्यातून प्रेम पुढे सरकत जाते. याचा अर्थ लागलीच होकार मिळेलच असे नाही. मग योग्य जोडीदार मिळण्यासाठी प्रतीक्षा करणे हे आलेच, पण आता सोशल नेटवर्कच्या माध्यमामुळे बर्‍याच गोष्टी कमी झालेल्या आहेत. प्रत्यक्ष समोर न येता सुसंवाद साधणे सोपे झालेले आहे. अंदाज घेऊन एक एक गोष्टी सुचवणे वाढलेले आहे. सचिन पिळगावकर या दोन्ही गोष्टींचे साक्षीदार आहेत. पहिला अनुभव आणि नंतर निरीक्षण अशा दोन टप्प्यातील प्रेम त्यांनी न्याहाळलेले आहे आणि त्यातून एक निश्चित झाले की प्रेम कधीच इतकं तितकं नसतं, तर ते एकतर असतं किंवा नसतं. यावर त्यांचा ठाम विश्वास आहे आणि तो त्यांनी यांच्या दिग्दर्शनात ‘अशी ही आशिकी’ या चित्रपटात दाखलेला आहे.

भूषण कुमार, क्रिशन कुमार यांच्यासोबत वजीर सिंह, जो राजन, सुप्रिया पिळगावकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर सोशल नेटवर्कवर प्रकाशित करण्यात आला. ‘अशी ही आशिकी’ या चित्रपटातील कथा ही आजच्या युवकांची आहे ज्यांनी सोशल नेटवर्कच्या माध्यमाला पूर्णपणे स्वीकारलेले आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांचा चिरंजीव अभिनय बेर्डे आणि हेमल इंगळे ही जोडी आजच्या प्रेमविरांचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्यांच्यासोबत सुनिल बर्वे, निर्मिती सावंत, करण भानुशाली, स्नेहल बोरकर, स्वामिनी वाडकर, सिद्धेश नागवेकर यांचा यात कलाकार म्हणून सहभाग आहे. प्रेम मोजून मापून केले जात नाही त्याला प्रेम म्हणतात, असा काहीसा संदेश यातून दिला जाणार आहे. प्रेम बदलत आहे याची जाणीव करून देणारा हा चित्रपट आहे. मार्च महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -