घरमनोरंजन'अशी ही आशिकी' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

‘अशी ही आशिकी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Subscribe

‘अशी ही आशिकी हा चित्रपट १ मार्चला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. मराठी जेष्ठ कलाकार सचिन पिळगांवकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

आशिकी शब्द उच्चारला की आपल्याला अनेक प्रेमकथा डोळ्यासमोर येतात. लैला-मजनू असो किंवा रोमिओ-ज्युलिएट अशा जोडप्यांच्या प्रेमकथा जभरात प्रसिद्ध आहेत. एख्याद्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करणे यालाच ‘आशिकी’ म्हणता येईल. अशाच प्रकारचं प्रेम आपल्याला ‘अशी ही आशिकी’ या नव्या मराठी चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. ‘अशी ही आशिकी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केले आहे. पिळगांवकर यांनी त्यांच्या वाढदिवशी या चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटामध्ये अभिनय बेर्डे आणि हेमल इंगले मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
टी-सिरीजचे भूषण कुमार आणि क्रिशन कुमार यांनी गुलशन कुमार प्रस्तुत ‘अशी ही आशिकी’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तसेच जो राजन, वजीर सिंह आणि सुप्रिया पिळगांवकर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.

ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित

‘अशी ही आशिकी’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटेची कथा तरुणाईच्या रोमँटिक प्रेम कथेवर आधारित आहे. सुनिल बर्वे, निर्मिती सावंत, करण भानुशाली, स्नेहल बोरकर, स्वामिनी वाडकर आणि सिध्देश नागवेकर यांची ही या चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका आहे.

- Advertisement -

‘जे मोजून मापून केल जात नाही त्यालाच प्रेम म्हणतात’, ‘प्रेम कधीच इतकं तितकं नसतं… ते एक तर असतं किंवा नसतं’ असे रोमँटिक डायलॉग्स हे आपल्याला या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहेत. या ट्रेलरमधील गाणी, डायलॉग, त्यांच्यातिल मैत्रीचे क्षण असल्याचे सांगितले जात आहे. प्रेक्षकांवर प्रेमाचा पाऊस पाडण्यासाठी ‘अशी ही आशिकी’ हा मराठी चित्रपट १ मार्चला राज्याभर प्रदर्शित होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -