पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात वाजणार भोंगा

‘भोंगा’ या आगामी चित्रपटाची १७ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये निवड झाली आहे. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदा ७ मराठी चित्रपट दाखवले जाणार आहेत.

Pune
Bhonga
भोंगा चित्रपट

सिनेमाध्यमाच्या रूढ चौकटी भेदण्याचा प्रयत्न करणारे चित्रपट मराठीत अगदी क्वचित आढळतात.राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी आपल्या चित्रपटातून कायमच हा प्रयत्न करत वास्तवाची जाणीव करून दिली आहे. असाच वेगळा विषय असलेल्या त्यांच्या ‘भोंगा’ या आगामी चित्रपटाची १७ व्यापुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये निवड झाली आहे.

सात मराठी चित्रपट दाखवले जाणार

‘पुणे फिल्म फाउंडेशन’ आणि ‘महाराष्ट्र शासन’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १७ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदा ७ मराठी चित्रपट दाखवले जाणार आहेत, त्यात ‘भोंगा’ या चित्रपटाचा समावेश आहे. १० ते १७ जानेवारी दरम्यान हा महोत्सव रंगणार आहे. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये ‘भोंगा’ची झालेली निवड ही निश्चितच आनंददायी असल्याचं दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी सांगितलं.

हे आहेत कलाकार

नलिनी प्रोडक्शनस निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन तसेच कथा–पटकथा शिवाजी लोटन पाटील यांची आहे. संवाद निशांत धापसे यांचे आहेत. छायांकन रमणीरंजन दास यांचे असून संकलन निलेश गावंड यांचे आहे. चित्रपटाची गीते सुबोध पवार यांनी लिहिली असून संगीतकार विजय गटलेवार यांनी ती संगीतबद्ध केली आहेत. कलादिग्दर्शन संतोष समुद्रे यांचे आहे. शिवाजी लोटन पाटील व अरुण महाजन चित्रपटाचे निर्माते आहेत तर महेंद्र टिसगे कार्यकारी निर्माते आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here