घरमनोरंजन'डोक्याला शॉट'चा कॉमेडी ट्रेलर लॉन्च

‘डोक्याला शॉट’चा कॉमेडी ट्रेलर लॉन्च

Subscribe

उत्तुंग हितेंद्र ठाकूर निर्मित ‘डोक्याला शॉट’ हा चित्रपट १ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटाचा धम्माल ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे.

‘डोक्याला शॉट’ नावाचा धमाल कॉमेडी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिनेमाच्या नावावरुनचं या सिनेमात काहीतरी वेगळे आणि मजेशीर पाहायला मिळणार हे नक्की. विशेष म्हणजे या सिनेमाच्यानिमित्ताने बॉलिवूडमधील लोकप्रिय गायक मिका सिंग मराठीत पदार्पण करणार आहे. मिकासिंगबरोबर गायक कैलाश खेर यांनी देखील या सिनेमात एक धम्माल गाणं गायलं आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लॉन्च सोहळा पार पडला आहे. गायक कैलाश खेर आणि अभिनेता रितेश देशमुख यांच्या उपस्थितीत हा लॉन्चींग सोहळा पार पडला.

चार मित्रांची ही गोष्ट

या चित्रपटातून सुव्रत जोशी, प्राजक्ता माळी, गणेश पंडित प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटात चार मित्रांची गोष्ट दाखवण्यात आली आहे. आपल्या मित्राला वाचवण्यासाठी वाट्टेल ते करणाऱ्या या मित्रांची ही धम्माल गोष्ट म्हणजे डोक्याला शॉट हा ट्रेलर पाहिल्यावर आपल्या लक्षात येतचं.

- Advertisement -

म्युझिक लॉन्च दरम्यान मी आज पर्यंत मराठी चित्रपटात गाणं गायलं आहे. पण डोक्याला शॉट चित्रपटासाठी गाणं हा अनुभव खूप वेगळा होता. गाणं खूप धम्माल झालं आहे. प्रेक्षकांना नक्की आवडेल, अशी आशा गायक कैलाश खेर यांनी व्यक्त केली आहे.

डोक्याला शॉटच्या निमित्याने ‘अ व्हिवा इनएन प्रॉडक्शन’ पुन्हा एकदा प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी देण्यासाठी सज्ज झाले आहे. उत्तुंग हितेंद्र ठाकूर निर्मित ‘डोक्याला शॉट’ हा चित्रपट १ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आजवर अनेक नावाजलेल्या चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शकाची भूमिका बजावणारे शिवकुमार पार्थसारथी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत.

- Advertisement -


वाचा – ‘शिल्पा supports पप्पू’, फॅन्सचा धुमाकूळ

वाचा – मेरी आवाज सुनो


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -