ही बॉलिवूड अभिनेत्री मराठी चित्रपटाच्या रिमेकमध्ये साकारतेय मुख्य भुमिका!

Mumbai

तीन वर्षांपूर्वी आलेल्या ‘लपाछपी’ सिनेमाचा रिमेक लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे. विशाल फुरिया दिग्दर्शित या सिनेमाचं नाव ‘छोरी’ असं आहे. नुसरत भरूचाची यात मुख्य भूमिका आहे. पूजा सावंत स्टारर ‘लपाछपी’ हा सिनेमाही विशालनेच दिग्दर्शित केला होता.

View this post on Instagram

Noah 🤍

A post shared by nushrat (@nushratbharucha) on

या सिनेमाबद्दल बोलताना विशाल म्हणाला की, ‘ छोरी हा मराठी सिनेमाचाच अधिकृत रिमेक आहे. प्रेक्षकांना मुळ मराठी सिनेमाही प्रचंड आवडला होता. हिंदीतही हा सिनेमा दिग्दर्शित करण्याची संधी मला मिळाली आहे तर आम्ही या सिनेमाला अधिक मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांसमोर आणू.’

तर पुजा सावंतने साकारलेली भुमिका आता नुसरत भरूचा साकारणार आहे या विषयी बोलताना नुसरत म्हणाली, ‘मला सिनेमाचा हा प्रकार फार आवडतो. या सिनेमाची कथा समाजावर एक वेगळा परिणाम करेल आणि प्रत्येकजण या कथेशी जोडलं जाऊ शकतं. विशालचं काम मला आवडतं आणि त्याच्यासोबत या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली याचा मला आनंदच आहे.

View this post on Instagram

From today in your nearest theatre ..

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant) on

छोरी’ या सिनेमाचे संवाद आणि पटकथा विशाल कपूरने लिहिली असून साइक प्रोडक्शनची निर्मिती असणार आहे. मराठी सिनेमात जी कथा दाखवण्यात आलेली तिच कथा हिंदीमध्येही असेल. मात्र त्यात थोडेफार बदल करण्यात येणार आहेत. मात्र चित्रपट कधी प्रदर्शित होणार याविषयी काही सांगण्यात आलेलं नाही.


हे ही वाचा – अक्षयचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित, कोटींमध्ये विकले हक्क!