‘परफ्युम’ या मराठमोळ्या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

येत्या १ मार्चला परफ्युम हा मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Mumbai
Perfume Movie Poster
परफ्युम चित्रपटाचा टीजर प्रदर्शित

सुगंधीत परफ्युमवरून तरूणांमध्ये फुलणाऱ्या प्रेमाची गंमत आता आपल्याला चित्रपटातून अनुभवायला मिळणार आहे. लवकरच आपल्या भेटीला ‘परफ्युम’ हा नवा मराठी चित्रपट येणार आहे. नुकताच दिवा येथे पारपडलेल्या ‘अखंड कोकण महोत्सवा’मध्ये ‘परफ्युम’ चित्रपटाचा टीझर लॉंच केला गेला. या चित्रपटात ओंकार दीक्षित आणि मोनालिसा ही नवी जोडी पहायला मिळणार आहे. अमोल कागणे स्टुडिओजचे अमोल कागणे आणि लक्ष्मण कागणे यांनी परफ्युम या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. याआधी अमोल कागणे यांनी हलाल सारख्या गाजलेल्या चित्रपटाची निर्मिती तसेच आगामी लेख जोशी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. या चित्रपटात सयाजी शिंदे, चिन्मय मांडलेकर, कमलेश सावंत, अभिजित चव्हाण, अनिल नगरकर, भाग्यश्री न्हालवे, हिना पांचाळ यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. किशोर गिऱ्हे यांची कथा असून, चित्रपटाचे संकलन हे पॉल शर्मा यांनी केले आहे.

या चित्रपटाच्या टीझर मध्ये नायीकेचे काही संवाद दाखवल आहे. नायीका कशी नायकाच्या परफ्युमच्या सुगंधाने त्याला ओळखते. तसेच ती कशी परफ्युममुळे त्यांची प्रेम कसे फुलते हे दिसत आहे. मात्र, त्यानंतर ही प्रेम कथा कशी रंग बदलते. या फुलण्याऱ्या प्रेमाला थ्रिरलचं रुपं कसं येतं? हे पाहणं खूप उत्सुकतेच ठरणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीत नवा सुगंध पसरवण्यासाठी ‘परफ्युम’ चित्रपट सज्ज झाला असून, १ मार्चला राज्यभरात हा सुगंध दरवळणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here