घरमनोरंजनचिन्मय उद्गीरकर दिसणार 'या' चित्रपटात

चिन्मय उद्गीरकर दिसणार ‘या’ चित्रपटात

Subscribe

चिन्मय आणि मयुरीला प्रेक्षकांनी सध्या कलर्स मराठीवरील घाडगे अण्ड सून या मालिकेत बघित आहेत. घाडगे अण्ड सून या मालिकेतील अक्षय हे पात्र चिन्मय साकारत आहे. तर याच मालिकेत अक्षयच्या बहिणीच्या भुमिकेत मयुरी आहे.

‘प्रेम’ या शब्दाचा प्रत्येक जण आपल्या सोयीने अर्थ काढत असतो. प्रेमाची व्याख्या, प्रेमाची रूपे देखील सर्वासाठी वेगळी असतात. काहीशा ह्याच संकल्पनेवर आधारित ‘प्रेमवारी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच या चित्रपटाच्या पोस्टरचे शिर्डी येथे साईबाबाच्या चरणी अनावरण करण्यात आले. या पोस्टरवर एक वेगळी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

काय आहे पोस्टरमध्ये?

या पोस्टरवर अभिनेता चिन्मय उद्गीरकर आणि मयुरी कापडणे दिसत आहेत. या दोघांचा रोमॅण्टीक अंदाज समोर आला आहे. त्यामुळे या चित्रपटात या दोघांची रोमॅण्टीक केमिस्ट्री दिसणार यात शंकाच नाही. ८ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

- Advertisement -

चिन्मय आणि मयुरीला प्रेक्षकांनी सध्या कलर्स मराठीवरील घाडगे अण्ड सून या मालिकेत बघित आहेत. घाडगे अण्ड सून या मालिकेतील अक्षय हे पात्र चिन्मय साकारत आहे. तर याच मालिकेत अक्षयच्या बहिणीच्या भुमिकेत मयुरी आहे. मालिकेतील त्यांच्या भावा बहिणीच्या नात्याने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. आता या दोघांचा रोमॅण्टीक अंदाज प्रेक्षकांना आवडेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा – ‘मुंबई पुणे मुंबई – ३’ ची तीन दिवसात ५ कोटींची कमाई

- Advertisement -

हा सिनेमा हा व्हॅलेंटाईन वीक साठीचा एक परफेक्ट चित्रपट असणार यात शंकाच नाही. साईममित प्रेडक्शनने या चित्रपटाची निर्मीती केली आहे. या चित्रपटातून प्रेमाची नवीन परिभाषा प्रेक्षकांना कळणार, हे नक्की! या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शक, निर्मीती राजेंद्र गायकवाड यांनी केले आहे. तर संगीताची धूरा अमितराज यांनी सांभाळली आहे.


हेही वाचा – पुरुपर्वातून ‘लक्ष्या’तल्या गोष्टी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -