घरमनोरंजनभाई’ एक पाऊल पुढे

भाई’ एक पाऊल पुढे

Subscribe

पु. ल. देशपांडे यांच्या अष्टपैलू व्यक्तीमत्त्वाचे दर्शन घडवणारा ‘भाई व्यक्ती की वल्ली’ हा चित्रपट येणार, प्रदर्शित होणार ही चर्चा आता थांबलेली आहे. आता चर्चा रंगते आहे ती भाई ग्रेट होते, जे ऐकलं ते पडद्यावर दिसलं आणि आता पूर्वार्धानंतर उत्तरार्धात काय पहायला मिळेल याची. पण हा चित्रपट निर्मिती करणार्‍या टीमचा आत्मविश्वास पाहिल्यानंतर आणि पूर्वार्धाला मिळालेले यश लक्षात घेता, उत्तरार्धही झकासच असणार असे वातावरण टीममध्ये निर्माण झालेले आहे. पूर्वार्धात बाल्यावस्था ते कलाकार कारकीर्द असा प्रवास घेतलेला आहे तर उत्तरार्धात एकपात्री प्रयोग आणि त्यातून साहित्यिक क्षेत्रात मिळवलेले उज्ज्वल यश, वाचकांचे नितांत प्रेम, पुरस्कार आणि वृद्धावस्थेत समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन असे अनेक पैलू यात दिसणार आहेत. ट्रेलर लाँच सोहळ्याला कलाकार, तंत्रज्ञ उपस्थित होते.

‘भाई एक पाऊल पुढे’ असे म्हणण्याचे कारण म्हणजे एकच शिर्षक-एकच कथा तीही भाग हा शब्द न वापरता पूर्वार्ध-उत्तरार्ध अशा शब्दात काही आठवड्याच्या अंतराने प्रदर्शित केला जाणारा ‘भाई…’ हा एकमेव चित्रपट आहे. पूर्वार्ध ४ जानेवारीला तर उत्तरार्ध ८ फेब्रुवारीला प्रदर्शित केला जाणार आहे. महत्त्वाचं म्हणजे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या या निर्णयाला वायकॉम १८ चे सीओओ अजित अंधारे आणि बिझनेस हेड निखिल साने यांनीही दुजोरा दिलेला आहे आणि त्यामुळेच जे ठरवले ते घडलेले आहे. विक्रम गायकवाड यांनी यातील बर्‍याचशा व्यक्तीरेखांना आपल्या नजरेतून घडवलेले आहे. त्याने ठरवले असते तर युवा अवस्थेतील पु. ल. ज्यांनी साकार केला त्या सागर देशमुखलाच ते वृद्धावस्थेतील पु. ल. दाखवू शकले असते पण यातही पुढचे पाऊल दिसलेले आहे. विजय केंकरे यांच्यावर वृद्धावस्थेतील पु. ल. दाखवण्याची जबाबदारी सोपवलेली आहे जी उत्तरार्धात दिसणार आहे. महेशने आणखीन एक पुढचा निर्णय घेण्याचे ठरवलेले आहे. तो म्हणजे ज्या प्रेक्षकांना हे दोन्ही चित्रपट एकाचवेळी पहायचे आहेत त्यांच्यासाठी दोन मध्यंतरे ठेवून हा चित्रपट दाखवण्याचे ठरते आहे. घोषणा किंवा यश व्यक्त करायचे झाले तर निर्मात्याला आलिशान हॉटेलमधील बंदिस्त हॉल महत्त्वाचे वाटलेले आहेत. पण उत्तरार्धाचा ट्रेलर लाँच सोहळा पु. ल. देशपांडे अकादमीच्या पटांगणात, चाळीच्या आवारात बसल्याचा आनंद देऊ शकेल असा सेट उभारण्यात आला होता. ही देखिल प्रमोशनची पुढची पायरीच म्हणावी लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -