घरमनोरंजनमर्दानी-२ चा ट्रेलर लाँच; अंगावर काटा आणणारी दृश्यं

मर्दानी-२ चा ट्रेलर लाँच; अंगावर काटा आणणारी दृश्यं

Subscribe

चित्रपटात राणी मुखर्जी पोलिसाच्या भूमिकेत असून राणीचा अभिनय पोलिसाच्या व्यक्तिमत्त्वाची छाप पाडणारा आहे.

अभिनेत्री राणी मुखर्जी अभिनीत आणि आदित्य चोप्रा निर्मीत ‘मर्दानी २’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटाचा ट्रेलर अंगावर काटा आणणारा आहे. चित्रपटात राणी मुखर्जी पोलिसाच्या भूमिकेत असून राणीचा अभिनय पोलिसाच्या व्यक्तिमत्त्वाची छाप पाडणारा आहे. यापूर्वी २०१४ मध्ये ‘मर्दानी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यावेळीसुद्धा चित्रपटाची कथा आणि राणी मुखर्जीच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती.

१३ डिसेंबर रोजी चित्रपट प्रदर्शित होणार

‘मर्दानी’ या चित्रपटानंतर प्रेक्षकांना चित्रपटाच्या पुढील भागाची उत्सुकता लागून राहिली होती. पण राणी मुखर्जी आई झाल्याने तिने काही काळ चित्रपटातून ब्रेक घेतला. त्यामुळे ‘मर्दानी – २’ येण्यास विलंब झाला. याचवर्षी एप्रिल महिन्यात ‘मर्दानी – २’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तो पाहून प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या होत्या. फर्स्ट लूक नंतर प्रेक्षक चित्रपटाच्या ट्रेलरची वाट पाहत होते. ‘मर्दानी – २’ च्या ट्रेलरमधून दिसणाऱ्या राणीच्या चित्रपटातील अभिनयाची प्रेक्षक प्रशंसा करत आहेत. चित्रपटात राणी मुखर्जी पोलिसाची भूमिका साकारत असून चित्रपटातील खलनायक अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यामुळे चित्रपटातील खलनायकाची भूमिका कोण साकारत आहे? याबाबत प्रेक्षक उत्सुक आहेत. आदित्य चोप्रा यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी गोपी पुराथन यांनी पार पाडली आहे. येत्या १३ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -