‘माझी आई काळुबाई’ मालिकेतील वाद उदयनराजेंच्या दरबारी

mazi aai kalubai, alka kubal meets udayanraje bhosale

‘माझी आई काळुबाई’ या मालिकेच्या निर्मात्या ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये आणि अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्यातील वाद आता शिगेला पोहोचला आहे. हा वाद साताऱ्याचे भाजपचे राज्यसभेचे उदयनराजे भोसले यांच्या दरबारात पोहोचला आहे. मालिकेच्या निर्मात्या अलका कुबल यांनी रविवारी खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली.

‘माझी आई काळुबाई’ या मालिकेतील कलाकारांमधील वाद चांगलाच चर्चेत आहे. या प्रकरणी साताऱ्यासह राज्यातील काही संघटनांनी अलका कुबल यांनी प्राजक्ता गायकवाडची माफी मागावी आणि मालिकेतील प्रमुख कलाकार विवेक सांगळे यांना मालिकेतून काढून टाकावे अन्यथा साताऱ्यात सुरु असलेले ‘माझी आई काळुबाई’ या मालिकेचे चित्रीकरण बंद पाडण्याची धमकी दिली जात आहे. याच पार्श्वभूमीवर अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये आणि समीर आठल्ये यांनी आज उदयनराजे भोसले यांची भेट घेऊन चित्रीकरणाच्या सेटवर प्राजक्ता गायकवाड यांची वस्तुस्थिती नेमकी काय होती ही मांडली. खासदार उदयनराजे यांनी अलका कुबल यांची बाजू जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडसोबत फोनवर चर्चा करुन हा वाद लवकरात लवकर मिटवावा, अशी विनंती केल्याची माहिती मिळाली आहे.

‘माझी आई काळुबाई’ ही मालिका चांगलीच चर्चेत आबहे. अभिनेत्री पार्जक्ता गायकवाड आणि अलका कुबल यांच्यात सोशल मीडियावर एकमेकांवर आरोप करत आहेत. प्राजक्ताने पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले आहेत. ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेचे चित्रीकरण साताऱ्यात सुरु होते. सेटवरील काही लोकांना कोरोनाची लागण झाल्याने गावकऱ्यांनी गावात चित्रीकरण करण्यास नकार दिला. त्यामुळे पुढील चित्रीकरण मुंबईत करण्याचे ठरले. त्यानुसार सर्वजण मुंबईत परतले. विवेक सांगळे आणि प्राजक्ता गायकवाड एकाच गाडीने येणार होते. मात्र, विवेकला उशीर झाल्याने प्राजक्ताने त्याला उशीर का झाला म्हणून हटकले. यावर बोलताना त्याने आपण कोव्हिड रुग्णांना दाखल करून येत असल्याचे सांगितले. त्यावेळी ती घाबरली. मात्र हे बोलून दाखवल्यावर विवेकने मला शिवीगाळ करत, माझ्या आईबद्दल अपशब्द उच्चारले, असा आरोप प्राजक्ताने केला.

प्राजक्ताने पत्रकार परिषद घेत आपली भूमीका मांडली. मला या मालिकेतून काढण्यात आले अशी खोटी बातमी पसरवली जात आहे. मी स्वत: या मालिकेमधून बाहेर पडले आहे. मला सेटवर विवेक सांगळे यांच्याकडून शिवीगाळ झाली. माझ्या आईबद्दल अपशब्द काढले गेले. तुमच्या मुलींसोबत असे काही घडले असते तर अलका ताई अशाच वागल्या असत्या का? असा सवालही तिने उपस्थित केला. मी इव्हेंटची सुपारी घेते असा आरोप झाला. कोरोनामुळे इव्हेंट बंद आहेत. त्यामुळे हे आरोप तथ्यहिन आहेत. पुढे ती म्हणाली, मालिकेत मला तोकडे कपडे घालण्याचे काही प्रसंग होते, त्याला माझा विरोध होता. शिवायय, प्राजक्ताने धक्कादायक आरोप असा केला की, मला रक्त लागलेली साडी दिली गेली, माझ्या आईने त्याविषयी विचारले तर त्याला माझ्या आईचा हस्तक्षेप म्हटलं गेल्याचे ती म्हणाली. याशिवाय, तिने मालिकेचे पैसे देखील मिळआले नसल्याचे म्हटले आहे.