घरट्रेंडिंग#MeToo: आमिर खानआधी अक्षयने सोडलेला 'तो' सिनेमा

#MeToo: आमिर खानआधी अक्षयने सोडलेला ‘तो’ सिनेमा

Subscribe

सुरुवातीला मोगुल चित्रपटासाठी अभिनेता अक्षय कुमारची निवड करण्यात आली होती. मात्र, काही कारणामुळे अक्षयने या चित्रपटाला रामराम ठोकला

बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने आता #MeToo मोहिमेत उडी घेतल्यामुळे, नव्या चर्चांना उधाण आलं आहे. ‘लैंगिक छळाचा आरोप लावण्यात आलेल्या दिग्दर्शकाचा चित्रपट मी सोडला आहे’, अशी घोषणा आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी ट्वीटरवरुन केली आहे. आमिरच्या या जाहीर खुलास्यामुळे आता #MeToo मोहिमेला एक वेगळ वळण लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, आमिर खानने जरी ‘त्या’ दिग्दर्शकाचं आणि ‘त्या’ चित्रपटाचं नाव उघड केलं नसलं तरी बॉलीवूडमध्ये मात्र या दोनही नावांची चर्चा आहे. बी-टाऊनमध्ये रंगत असलेल्या चर्चांनुसार लैंगिक शोषणाचा आरोप लावण्यात आलेला तो दिग्दर्शक सुभाष कपूर आहे. तर, आमिर खानने सोडलेल्या त्या चित्रपटाचं नाव ‘मोगुल‘ असं आहे. मोगुल हा चित्रपट गुलशन कुमार यांच्या जीवनावर आधारित असून, सुभाष कपूर या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. आमिर खानने काही महिन्यांपूर्वी आपण ‘मोगुल’ चित्रपटात काम करणार असल्याची घोषणा केली होती. आता या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आमिरने सोडलेला तो चित्रपट ‘मोगुल‘च असल्याच्या चर्चा रंगत आहेत. मोगुल या बहुचर्चित चित्रपटाचे दिग्दर्शक सुभाष कपूर यांनी आपला लैंगिक छळ केल्याचा आरोप, अभिनेत्री गितीका त्यागी हिने केला होता. उपलब्ध माहितीनुसार याप्रकरणी सुभाष यांच्यावर सध्या खटला सुरू आहे.


#MeToo : नाना पाटेकरांवर अखेर आरोप दाखल

याआधी अक्षयने सोडला होता ‘मुगल’

सुरुवातीला मोगुल चित्रपटासाठी अभिनेता अक्षय कुमारची निवड करण्यात आली होती. अक्षयनेही सोशल मीडियाच्या माध्यमातून मोगुल चित्रपटाचे एक पोस्टर शेअर करत, आपण या चित्रपटात काम करत असल्याची अधिकृत घोषणा केली होती. मात्र, काही काळानंतर अचानक अक्षयने हा चित्रपट सोडल्याची बातमी व्हायरल झाली. अक्षय आणि मोगुल चित्रपटांच्या निर्मात्यांमध्ये वाद झाल्यामुळे अक्षयने चित्रपटाला रामराम ठोकल्याचं कारण त्यावेळी समोर आलं होतं. अक्षयने स्वत:ही याबाबतचा जाहीर खुलासा केला होता. ‘चित्रपटाच्या स्क्रिप्टवरुन माझ्यामध्ये आणि निर्मात्यामध्ये एकमत न झाल्यामुळे मी हा चित्रपट सोडत आहे’, असं स्पष्टीकरण अक्षयने त्यावेळी दिलं होतं. त्यानंतर मोगुल चित्रपटात आमिर खान काम करणार असल्याचं नक्की झालं. आता आमिरने जो चित्रपट सोडल्याचं जाहीर केलं आहे, तो हाच चित्रपट आहे की कुठला अन्य चित्रपट हे येणारी वेळच सांगेल.


#MeToo प्रकरणी, अभिनेत्री हुमा खुरेशीचे आवाहन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -