घरमनोरंजन#MeToo बदल नाही फक्त गवगवा होतोय - मलायका अरोरा

#MeToo बदल नाही फक्त गवगवा होतोय – मलायका अरोरा

Subscribe

मलायका अरोरा ही बॉलीवूडमधील प्रसिद्ध नायिकांपैकी एक म्हणून ओळखली जाते. तिच्या म्हणण्यानुसार #MeToo चळवळीबद्दल सध्या केवळ चर्चाच केली जात आहे, त्याचा फक्त गवगवा होत आहे.

भारतामध्ये गेले महिनाभर #MeTooचवळवळीची चर्चा आहे. रोज नव्याने कोणाचे ना कोणाचे तरी नाव समोर येत आहे. कितीतरी महिलांनी तनुश्री दत्ताने आवाज उठवल्यानंतर या चळवळीअन्वये बोलण्याचा निर्धार करत बर्‍याच गोष्टी समोर आणल्या आहेत. मात्र असे असताना आता अभिनेत्री मलायका अरोराने एक विधान केलं आहे ज्यामुळे कदाचित या चळवळीला वेगळं वळण लागण्याचीही शक्यता आहे. मलायकाच्या मते सध्या या #MeToo चळवळीमुळे बदल होतच नाहीये तर केवळ गवगवा होत आहे.

काय नक्की म्हणाली मलायका?

मलायका अरोरा ही बॉलीवूडमधील प्रसिद्ध नायिकांपैकी एक म्हणून ओळखली जाते. शिवाय मलायकाची ओळख ४३ व्या वर्षीही सेक्स सिम्बॉल अशीच आहे. आयएएनएस वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये #MeToo चळवळीमुळे नक्की काय बदल झाले आहेत असा प्रश्न विचारला असता, मला कोणताही मोठा बदल झाल्याचे दिसून येत नाही. मी लोकांच्या गोष्टी सध्या ऐकत आहे. पण मला वाटतं की, बदलापेक्षाही याचा केवळ गवगवाच जास्त होत आहे. दरम्यान या चळवळीला अजून बरंच पुढे जायचं असल्याचंही मत मलायकाने व्यक्त केलं आहे. इतकंच नाही तर, मलायकाच्या म्हणण्यानुसार, मनोरंजन क्षेत्राबद्दल बोलल्यास, इथे बरंच काही घडताना दिसत आहे. लोक बर्‍याच गोष्टींची चर्चा करत आहेत. मात्र खर्‍या बदलासाठी लोकांनी पुढे येऊन हे अभियान पुढे नेण्याची आणि या अभियानाला यश मिळवून दाखवण्याची गरज आहे. हा बदल रातोरात घडून येणार नाही.

- Advertisement -

दरम्यान ही #MeToo चळवळ भारतामध्ये अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर लावलेल्या आरोपनंतर अधिक वाढत गेली आहे. यामध्ये आतापर्यंत अनु मलिक, कैलाश खेर, चेतन भगत, विकास बहल, सुभाष घई, आलोकनाथ, साजिद खान यांसारख्या लोकांची नावे गुंतलेली आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -