घरमनोरंजन#MeToo; तनुश्रीच्या आरोपांबाबत नाना अखेर बोलले...

#MeToo; तनुश्रीच्या आरोपांबाबत नाना अखेर बोलले…

Subscribe

नाना पाटेकर यांचा २००८ साली ‘हॉर्न ओके प्लीज’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. अभिनेत्री तनुश्री दत्ता या चित्रपटामध्ये एक आयटम साँग करत होती. आयटम साँगसाठी जो सेट तयार करण्यात आला होता. या सेटवर नाना पाटेकरांनी आपल्यासोबत छेडछाड केल्याचा आरोप अभिनेत्री तनुश्री दत्ताने केला. अनेक माध्यमांवर तिने याबाबत प्रतिक्रिया दिली. तनुश्रीने नानावर केलेल्या आरोपांनंतर ‘सिने अॅण्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन’ (ctaa – सिटा) ने नाना पाटेकरांना नोटीस बजावली. सिटाच्या या नोटीसला नानांनी उत्तर दिले आहे. नानांनी उत्तरात म्हटले आहे की, त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत. त्यामध्ये काहीही तथ्य नाही. शिवाय तनुश्रीवर मी कायदेशीर कारवाईदेखील करणार असल्याचेही नानांनी म्हटले आहे.

- Advertisement -

नानांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री तनुश्री दत्ताने ओशिवरा पोलीस ठाण्यात नाना पाटेकर यांच्याविरोधात रीतसर तक्रार नोंदवली आहे. त्यामध्ये नानांची नार्को, ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर टेस्ट करण्याची मागणीदेखील तिने केली आहे. तिने नाना पाटेकर यांच्यासह हॉर्न ओके प्लीज चित्रपटाचे नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य, निर्माते सामी सिद्दीकी आणि दिग्दर्शक राकेश सारंग यांची सुद्धा नार्को, ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर टेस्ट करण्याची मागणी केली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -