घरमनोरंजनमी अ‍ॅण्ड सी कोरिओग्राफर्स

मी अ‍ॅण्ड सी कोरिओग्राफर्स

Subscribe

कलेच्या प्रांतात करिअर करायचे झाले तर आजही ग्रामीण भागातील कलाकार मुंबई, पुण्याच्या दिशेने धाव घेतात, पण आता परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. तुम्ही तुमच्या गावात तुमचे अस्तित्त्व दाखवू शकता. थोडेफार यश मिळाले तर शहर गाठायला काहीच हरकत नाही, अशी खात्री आजच्या सांस्कृतिक चळवळीने दिलेली आहे. सोशल नेटवर्कच्या माध्यमातून तुमच्या कामाची दखल घेतली जाते. संपूर्ण महाराष्ट्राला सामावून घेईल अशा एकांकिका स्पर्धा, रिअ‍ॅलिटी शो होत असतात. तिथे तुम्ही तुमची चमक दाखवू शकता. त्यामुळे नाटक, मालिका, चित्रपट यात काम करणे तसे आता अवघड नाही. फक्त त्याला महत्त्वाकांक्षेची, जिद्दीची जोड द्यायला हवी.

मिनल ढापरे हे नाव तसे आपल्याला नवीन राहिलेले नाही. कराडच्या या कन्येचे आता भारतातील आघाडीच्या ज्या गृहिणी आहेत, त्यात मिनलचे नाव घेतले जाते. बॅटमिंटन, हॉलिबॉल स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर चमक दाखवल्यानंतर महाविद्यालयीन अध्यापनाचे कार्य , पती प्रसादच्या हॉटेल व्यवसायात सहभाग असताना नृत्यातही करिअर करावे असे तिला वाटले. स्वत:ला आजमावत असताना मिनल डान्स अकॅडमीची स्थापना केली आणि तिच्या जीवनात चमत्कार झाला. ‘दिल से नाचे इंडिया’, ‘डान्स दिवाने’, ‘दम दमा दम, ‘बुगीवूगी’ आदी रिअ‍ॅलीटी शोमध्ये संपूर्ण भारतीय प्रेक्षकांनी दखल घ्यावी असा देखणा, भारावून टाकणारा नृत्याविष्कार इथे घडवला. यातून आता आणखीन एका संस्थेची स्थापना तिने केली आहे. ‘मी अ‍ॅण्ड सी कोरिओग्राफर्स’ याची धुरा तिची कन्या सिद्धी ढापरे हिच्यावर सोपवलेली आहे.

- Advertisement -

क्रीडापटू, उद्योगी, डान्स अकॅडमीची संचालिका असा प्रवास करणार्‍या मिनलला माधुरी दीक्षित, सलमान खान, अक्षय खन्ना, शाहरुख खान यांच्याबरोबर प्रत्यक्ष नृत्य करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. या लोकप्रियतेचा चांगला परिणाम तिच्या डान्स अकॅडमीवर झालेला आहे. नृत्याच्या क्षेत्रात करिअर करू पाहणारी मुलं-मुली अकॅडमीमध्ये प्रवेश घेतातच, परंतु चाळीशी उलटलेल्या पण नृत्याचा आनंद घेऊ पाहणार्‍या महिलांनासुद्धा नृत्याचे प्रशिक्षण देणे सुरू केलेले आहे. प्रचंड अशा नवकलाकारांचा ताफा तिच्याकडे असल्यामुळे सामाजिक कार्याचा एक भाग म्हणून जनजागृतीच्या मोहिमेतही ती स्वत:बरोबर प्रशिक्षणार्थिंना सामावून घेत असते.

एक हजारहून अधिक नृत्यांगणा जेव्हा कारगिल युद्धातील विजयाचा आनंद गेली अनेक वर्ष सातत्याने साजरा करतात तेव्हा कराडकरांचा ऊर भरून येतो. आता जबाबदार्‍या वाढल्या आहेत म्हटल्यानंतर मी म्हणजे मिनल आणि सी म्हणजे सिद्धी असे काहीसे शब्द घेऊन नव्या मुलामुलींना शिकवण्याची जबाबदारी सिद्धीवर सोपवलेली आहे. सिद्धीचा ‘चांदणी’ हा अल्बम लोकप्रिय झालेला आहे. अलीकडचे जेवढे म्हणून डान्समधील कलाप्रकार आहेत, त्यांचे प्रशिक्षण सिद्धी देते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -