घरताज्या घडामोडीमिकाने घेतली भूषण कुमारची बाजू, सोनूला चांगलेच सुनावले!

मिकाने घेतली भूषण कुमारची बाजू, सोनूला चांगलेच सुनावले!

Subscribe

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्येनंतर सिनेजगतातील घराणेशाही आणि ग्रुपीझमचा प्रकार चव्हाट्यावर आला.

बॉलिवूडचा दिग्गज गायक सोनू निगमने संगीत उद्योगात सध्या सुरू असलेल्या माफियागिरीचा उल्लेख केला. तेव्हापासून तो चर्चेत आहे. एकीकडे अनेक गायक सोनू निगमच्या समर्थनार्थ आले आहेत, तर बॉलिवूडचा स्टार गायक मिका सिंग याला मात्र सोनूचं म्हणणं अजिबात पटलेलं नाहीये. बॉलीवूड इंडस्ट्री हे काम करण्यासाठी एक सुंदर ठिकाण आहे आणि त्याचा आदर केला पाहिजे, असे मत मिका सिंगने व्यक्त केलं आहे.

याविषयी बोलताना मीका सिंग म्हणाला की, या क्षेत्रात केवळ कलेची किंमत असते. मी २००७ मध्ये मुंबईला आलो. चित्रपट निर्माता संजय गुप्ता यांनी मला शूटआऊट अट लोखंडवाला या चित्रपटातून ब्रेक दिला. कामाच्या बाबतीत हे क्षेत्र खूप चांगलं आहे. त्याचा आदर केला पाहिजे. मी इंडस्ट्रीमध्ये मागील काही काळामध्ये लक्षात घेतले आहे की असे बरेच गायक आहेत ज्यांनी स्वत: ची छाप पाडली आहे.

- Advertisement -

मिका म्हणाला, सोनू निगम म्हणतात की त्यांना गाण्याची संधी मिळत नाही. परंतु असे बरेच  गायक आहेत. जे पूर्वी खूप गाजले आहे. यात अरिजीत सिंग, अरमान मलिक आणि बी प्राक या गायकांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त आमच्या पंजाब इंडस्ट्रीमध्ये सुध्दा अनेक बरेच हुशार गायक आहेत. आता बी प्रॅक हा इंडस्ट्रीमधील कोणाचाचा नातेवाईक नाहीये. बर्‍याच जणांची नावे घेतली जात आहेत आणि त्यापैकी बर्‍याच जणांना भूषण कुमारने ब्रेक दिला आहे.

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्येनंतर सिनेजगतातील घराणेशाही आणि ग्रुपीझमचा प्रकार चव्हाट्यावर आला. त्यानंतर अनेक कलाकार, सेलिब्रिटींना या विषयाला दुजोरा देत बॉलीवूडमध्ये सुरू असलेल्या गैरप्रकाराला वाचा फोडली. यासोबतच संगीत क्षेत्रातील दिग्गजांनीही काही गैरप्रकारांबाबत खुलासा केला असून पार्श्वगायक सोनू निगम यांनी काही दिवसांपूर्वी सुशांतच्या निधनानंतर एक व्हिडिओ शेअर करून संगीत क्षेत्रातील लोकांसाठी भीती व्यक्त केली होती. आता पुन्हा त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट करून टी सिरीजचे मालक भूषण कुमार त्यांना थेट इशारा दिला आहे.

- Advertisement -

गायक सोनू निगम यांनी संगीत क्षेत्रातील माफियांबाबतचा उल्लेख आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये केला होता. नवोदित गायकांवर अशाप्रकारे दबाव टाकला जात आहे. असेच सुरू राहिले तर संगीतकार, गीतकार आणि गायकांमधूनही आत्महत्येच्या बातम्या येऊ लागतील, असे त्यांनी म्हटले होते. तर आता सोनूने भूषण कुमार यांच्यावर निशाणा साधत काही जुन्या गोष्टींनी आठवणी त्यांना करून दिली आहे.


हे ही वाचा – नाटक सुरू होणार! तुमच्या आवडत्या आणि जवळच्या नाट्यगृहात!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -