घरमनोरंजनमिलिंद इंगळे - सौमित्र पुन्हा एकत्र

मिलिंद इंगळे – सौमित्र पुन्हा एकत्र

Subscribe

तब्बल २० वर्षांपूर्वी मराठी अल्बम ‘गारवा’ याने मराठीच नव्हे तर हिंदी आणि इतर भाषिक युवकांनाही वेड लावले होते. गायक संगीतकार मिलिंद इंगळेच्या अल्बममधील सर्व गाणी सौमित्र म्हणजेच कवी-अभिनेता किशोर कदम यांनी शब्दबद्ध केली होती.

तब्बल २० वर्षांपूर्वी मराठी अल्बम ‘गारवा’ याने मराठीच नव्हे तर हिंदी आणि इतर भाषिक युवकांनाही वेड लावले होते. गायक संगीतकार मिलिंद इंगळेच्या अल्बममधील सर्व गाणी सौमित्र म्हणजेच कवी-अभिनेता किशोर कदम यांनी शब्दबद्ध केली होती. आता पुन्हा एकदा ही जोडी प्रेक्षकांसाठी नवाकोरं गाणं घेऊन आली आहेत. ‘तिला सांगा कुणी तरी’ हे गाणं नुकतंच यु ट्यूबवर रिलीज झाले असून काही दिवसातच या गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

‘गारवा’ अल्बममधील सर्वच गाणी लोकप्रिय ठरली होती. या अल्बमचे वैशिष्ट्य म्हणजे गाण्याच्या मध्येच सौमित्रच्या आवाजात ऐकू येणारे कवितांचे गद्यवाचन हे होते. त्यामुळे म्युझिकवर गाणं आणि कविता या दोन्हीचा आनंद प्रेक्षकांना घेता आला. एकंदर हा प्रयोग यशस्वी ठरला. त्यानंतर दोघांनी ‘तुझ्या टपोरं डोळ्यात’ हे गाणं चाहत्यांसमोर आणलं. तसेच आता ‘तिला सांगा कुणी तरी’ हे गाणंही जोडी घेऊन आले आहेत. या गाण्याला स्वर आणि संगीतबध्द स्वतः मिलिंद इंगळे यांनी केले असून गाण्यांचे बोल हे सौमित्र यांचे आहेत. ‘दाटुनी आले, तिला सांगा कुणी, मन गर्भार झाले, तिला सांगा कुणी…’ असे या गाण्याचे बोल आहे. अभिनेत्री मीरा जोशी हिच्यावर हे गाणं चित्रित झालं असून मिलिंद स्वतः देखील या गाण्यात दिसत आहे.

- Advertisement -

राम गणेश गडकरी स्मृती शताब्दीनिमित्त ‘क्षण एक पुरे प्रेमाचा’चे आयोजन

 मुंबई ।ज्येष्ठ साहित्यिक कै. राम गणेश गडकरी यांच्या स्मृती शताब्दीनिमित्त दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने रविवारी, २६ ऑगस्ट २०१८ या दिवशी सायंकाळी ५ वाजता ‘क्षण एक पुरे प्रेमाचा’ हा विशेष साहित्यिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. डॉ. सुधा जोशी तसेच रविंद्र आवटी यांच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमात प्रमोद पवार, संजय मोने, उपेंद्र दाते, रजनी वेलणकर, रुजुता देशमुख, पूर्वी भावे यांचा सहभाग असणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा पिंपळखरे करणार असून यावेळी ‘एकच प्याला’, ‘प्रेम संन्यास’ आणि ‘भावबंधन’ या नाटकांतील प्रवेशांचे अभिवाचन तसेच कवितांचे सादरीकरण देखील होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून अधिकाधिक साहित्यिक आणि कला रसिकांनी यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.


छोट्या सूरवीरांची सुरेल सुरुवात

मुंबई । सूर नवा ध्यास नवा – छोटे सूरवीर’ या पर्वाची घोषणा झाली त्यानंतर त्यातील लहान मुलं काय कमाल करणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. काल झालेल्या पहिल्याच एपिसोडमध्ये या लहान सूरवीरांच्या आवाजाची जादू प्रेक्षकांना अनुभवायला मिळाली. ६ ते १५ वयोगटातील बच्चे कंपनीने आपल्या गाण्यामुळे प्रेक्षकांबरोबर परिक्षकांनाही भूरळ घातली. आता एकापेक्षा एक वेगळे आवाज प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहेत. कालपासून गाला राऊंडची रॉकिंग सुरुवात झाली आहे. निरागस आणि लोभस स्वरांनी सूर नवा कार्यक्रमाचा मंच बहरून गेला. आता आठवड्यातील तीन दिवस प्रेक्षकांना या सूरवीरांचे रॉकिंग परफॉर्मन्स बघायला मिळणार आहेत.

- Advertisement -

या पर्वात बच्चे कंपनी असल्यामुळे गाण्याबरोबर मस्ती तर होणारच आहे. ऑडिशन राऊंडमध्ये पोवाडा गाऊन सगळ्यांची मनं जिंकणारा औरंगाबादचा हर्षद या मुलांचा आता मॉनेटर झाला आहे. लहान मुलं निष्पाप असतात आणि ते कधीही कोणाला काहीही विचारू शकतात. हर्षदने कार्यक्रमाची परीक्षक शाल्मली खोलगडेला देखील एक प्रश्न विचारून आश्चर्यचकित केले की तू ऑडीशन्सला का नव्हती इतकेच नसून गाणं म्हणेन पण नाचायचे नाही असे देखील हर्षदने शाल्मलीला सांगितलं. मात्र त्याने गायलेल्या ‘खंडेरायाच्या लग्नाला’ या गाण्यावर सगळ्यांनीच ठेका धरला. हे सगळे असूनसुध्दा हे छोटे सूरवीर अफलातून गाणी म्हणतात यात शंका नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -