‘लक्ष्मी’ नंतर तृतीयपंथीयांवर येणार आणखी एक चित्रपट; ‘हा’ अभिनेता मुख्य भूमिकेत!

एकदा मिलिंद सोमणने एक फोटो शेअर करून साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी’ हा चित्रपट सोमवारी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची प्रदर्शनापूर्वीच तुफान चर्चा होती. मात्र ‘लक्ष्मी’ नंतर तृतीय पंथियांवर आणखी एक चित्रपट येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मिलिंद सोमण गोव्यातील बीचवर न्यूड फोटोंमुळे अनेकांच्या चर्चेत होता. दरम्यान, पुन्हा एकदा मिलिंद सोमणने एक फोटो शेअर करून साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘लक्ष्मी’ चित्रपटाच्या विषयाप्रमाणेच मिलिंद सोमणनेही एक चित्रपट बनवणार असल्याची घोषणा केली आहे. याविषयी एक ट्विट करून मिलिंदने चाहत्यांना याचे संकेत दिले आहेत. या नव्या प्रोजेक्टसाठी तो खूप उत्साही आहे.

मिलिंदने चाहत्यांना दिले संकेत

मिलिंद सोमणने शेअर केलेल्या ट्विटमध्ये फोटोशिवाय अधिक कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. या शेअर केलेल्या फोटोमध्ये तो एका महिलेच्या लूकमध्ये दिसत आहे. डोळ्यात मस्करा, लांबसडक केस, चेहऱ्यावर एकाबाजूला सिंदूर आणि नाकात सुंदर नथ दागिणे घातल्याचे पाहायला मिळतेय. मिलिंदच्या या लूकमुळे कुतूहल निर्माण झाले असून चाहत्यांमध्ये देखील याची उत्सुकता दिसतेय.

मोठ्या ब्रेकनंतर मिलिंद सोमण दमदार कमबॅक करण्याच्या तयारीत असण्याची शक्यता दिसतेय. मात्र या नव्या प्रोजेक्टविषयी अद्याप कोणतीही माहिती अधिकृतपणे स्पष्ट झाली नाही. मात्र जर मिलिंदने पुन्हा धमाकेदार एण्ट्री घेतली तर मिलिंदच्या चाहत्यांसाठी मनोरंजनाची पर्वणी ठरणार हे नक्की.

‘लक्ष्मी’ चित्रपटाने प्रेक्षकांची केली निराशा

अनेक वादानंतर आणि दीर्घ प्रतीक्षेनंतर अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी’ हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला. ट्रेलर रिलीज होताच या चित्रपटाने अनेक वाद ओढवून घेतले. मात्र सरते शेवटी ‘कंचना’ या तेलगू चित्रपटाचा रिमेक असलेला हा चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचला. मात्र तृतीयपंथीयांकडे बघण्याची समाजाची संकुचित वृत्तीवर प्रहार करतो. हा चित्रपट एका संवेदनशील मुद्यावर भाष्य करतो, मात्र मनोरंजनाच्या बाबतीत चित्रपटाची कथा अगदीच अपेक्षाभंग करते.

या चित्रपटात कियाराने तिची भूमिका जरी चांगली साकारली असली तरी अक्षयसोबत तिची जोडी जमत नाही. चित्रपटात अक्षय कुमारचं वय जास्त असल्याचे सहज दिसून येते आणि त्या तुलनेत कियारा खूपच तरुण वाटते. तर सहाय्यक कलाकार म्हणून अश्विनी काळसेकर, राजेश शर्मा, आयशा रझा आणि मनु ऋषी यांनी उत्तम काम केल्याचे देखील दिसते. तर या चित्रपटात शरद केळकरने छोटी पण तितकीच दमदार भूमिका साकारली आहे. थोड्या वेळासाठी चित्रपटात झळकणारा शरद प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडतो.


आव्हानात्मक भूमिकेसाठी तापसी सज्ज; ‘रश्मी रॉकेट’चा शेअर केला फर्स्ट लूक