घरमनोरंजननव्या कारभारणीसह मिलिंद सोमणचा 'बिग बॉस'मध्ये गृहप्रवेश?

नव्या कारभारणीसह मिलिंद सोमणचा ‘बिग बॉस’मध्ये गृहप्रवेश?

Subscribe

'बिग बॉस'च्या नव्या पर्वामध्ये सुप्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण आपली कारभारीण अर्थात बायको अंकिता कोनवारसोबत सहभागी होणार असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे.

मराठी बिग बॉस सध्या अखेरच्या टप्प्यात आलं आहे, तर हिंदी बिग बॉसची यावर्षी नेहमीपेक्षा लवकर तयारी सुरु झाली आहे. या हंगामातही सलमान खान हा शो होस्ट करणार असून यावेळी हिंदी बिग बॉसमध्ये जोडीनं स्पर्धक बघायला मिळणार आहेत. या नव्या पर्वामध्ये सुप्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण आपली कारभारीण अर्थात बायको अंकिता कोनवारसोबत सहभागी होणार असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. या सीझनमध्ये पहिल्यांदाच घरात स्पर्धक म्हणून पती – पत्नी अथवा जोडी अशी संकल्पना मांडण्यात आल्यामुळं प्रेक्षकांमध्येदेखील उत्सुकता आहे.

मिलिंद – अंकिताचं झालं नुकतंच लग्न

मिलिंदनं आपल्यापेक्षा जवळपास अर्ध्या वयाच्या मुलीशी अर्थात अंकिता कोनवार हिच्याशी नुकतंच लग्न केलं आहे. त्यांच्यातील वयाच्या अंतरामुळं हे लग्न होणार की नाही इथंपासून अंकितानं शेवटच्या क्षणी लग्नाला नकार दिला अशा प्रकारच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र या सगळ्या अफवांनंतरही दोघांनी लग्न केलं. त्यानंतर नेहमीच दोघंही सोशल मीडियावर सतत आपले फोटो पोस्ट करत असतात. मिलिंद सोमणचं जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. त्यातही मुली त्याच्या जास्त फॅन्स आहेत. त्यामुळं बिग बॉसमध्ये आपल्या बायकोसह मिलिंद आल्यास, या शो ची चर्चा आणि रंगत नक्कीच वाढेल. या दोघांनाही या शो साठी विचारण्यात आल्याची माहिती आहे. मात्र अजूनही मिलिंद आणि अंकिता या दोघांकडूनही होकार आल्याची माहिती स्पष्ट झालेली नाही. दोघांनीही याबाबत अजूनही कोणतीही पोस्ट केलेली नाही. त्यामुळं अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

- Advertisement -

‘बिग बॉस’ नव्या पर्वात जोडी संकल्पना

‘बिग बॉस’ नव्या पर्वात जोडीची संकल्पना आहे. पत्नी – पत्नी, प्रियकर – प्रेयसी, आई – मुलगा, वडील – मुलगी, भाऊ – बहीण अशा जोड्या या पर्वात पाहायला मिळणार आहेत. त्यामुळं मिलिंद आणि अंकिताच्या जोडीव्यतिरिक्त अजून कोणत्या जोड्या या पर्वात पाहायला मिळतील याची सध्या प्रेक्षकांनासुद्धा उत्सुकता लागून राहिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -