Mirzapur 2: मिर्झापूरच्या रक्तबंबाळ खेळात ‘या’ नवीन चेहऱ्यांची एंट्री

mirzapur 2 entry of vijay varma, isha talwar and priyanshu painyuli watch trailer
Mirzapur 2: मिर्झापूरच्या रक्तबंबाळ खेळात 'या' नवीन चेहऱ्यांची एंट्री

बहुचर्चित ‘मिर्झापूर’ या वेबसिरीजच्या दुसऱ्या सीझनचा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. २३ ऑक्टोबरला ‘मिर्झापूर २’ रिलीज होणार आहे. मिर्झापूरच्या पहिल्या सीझनमध्ये पंकज त्रिपाठी, देव्यंदू शर्मा, अली फजल आणि विक्रांत मेसी या स्टार कास्टच्या अभिनयासोबत डायलॉग्सनी लोकांना अक्षरशः वेड लावले होते. या सीझनमध्ये जुन्या चेहऱ्यांसोबत काही नवीन चेहरे देखील दिसणार आहे. परंतु सध्या ती नव्या चेहऱ्यामध्ये काही जणांची सर्वाधिक चर्चा होत आहे. ते आहेत, विजय वर्मा, प्रियांशु पुल्ली आणि ईशा तलवार. हे तीन नवे चेहर ‘मिर्झापूर २’ बाबत काय म्हणाले ते जाणून घ्या

विजय वर्मा

अभिनेता विजय वर्मा ‘मिर्झापूर २’ बाबत म्हणाला की, ‘सध्या मी आपल्या भूमिकेबद्दल काही बोलू शकत नाही. मी स्वतः मिर्झापूरचा फॅन आहे. मी मिर्झापूरचा सीझन २ कधी येईल याची वाट बघत होतो. यादरम्यानच ‘गल्ली बॉय’ रिलीज झाला आणि ‘गल्ली बॉय’ रिलीज झाल्यानंतर मला पहिली ऑफर ‘मिर्झापूर २’ची आली. निर्माता रितेश सिधवानीने सांगितले की, तु ‘मिर्झापूर २’मध्ये ये. मी हैदराबाद येथून आहे. जेव्हा माझ्या मित्रांना मी ‘मिर्झापूर २’मध्ये असल्याचे समजले तेव्हा माझ्या मित्रांना खूप आनंद झाला. ते खूप उत्सुकतेने या सीझनची वाट पाहत आहेत.

प्रियांशु पैन्यूली

अभिनेता प्रियांशु पैन्यूली अलीकडेच इंटरनॅशनल प्रोजेक्ट एक्सट्रैक्शन या चित्रपटात नकारात्मक भूमिका करताना दिसला. आता देखील प्रियांशु ‘मिर्झापूर २’मध्ये खलनायकाच्या भूमिका दिसणार आहे. याबाबत प्रियांशु म्हणाला की,”एक्स्ट्रैशन’मध्ये नकारात्मक भूमिकेत पाहून माझी आई म्हणाली होती की, आता तू इतकी हिंसा करणार नाहीस. तेव्हा मी माझ्या आईला माझा पुढचा प्रोजेक्ट ‘मिर्झापूर २’ असल्याचे सांगितले. जिथे सतत लोक बंदूक चालवतात पण मी बंदूक चालवणार नाही. माझ्या भूमिकेचे नाव ‘रोबिन’ आहे. ही भूमिका नकारात्मक आहे की सकारात्मक हे तुम्ही ठरवा. माझ्या मते हे एक अतिशय मनोरंजक भूमिका आहे. तो जे काही करत आहे त्यामागे हेतू आहे.

ईशा तलवार

या दोन पुरुष भूमिकेसोबत एक महत्त्वाची महिलेची भूमिका पण या ‘मिर्झापूर’च्या कहानीचा भाग होणार आहे. या महिलेची भूमिका अभिनेत्री आणि मॉडेल ईशा तलवार करत आहे. ईशा तलावर याबाबत म्हणते की, ‘मला कोणत्याही प्रोजेक्टसाठी ६ ते ७ राउंड ऑडिशन द्याव्या लागल्या आहेत. परंतु पहिल्यांदा मला एका ऑडिशनमध्ये ‘मिर्झापूर २’साठी निवडले आहे. मी आतापर्यंत स्क्रीनवर खूप प्रेमळ आणि चुलबुली टाईपच्या भूमिकेत दिसली आहे. पण ‘मिर्झापूर २’मध्ये मला खूप वेगळीच भूमिका मिळाली आहे. मला माझे मीम्स पाहण्यात खूप उत्सुकता आहे.’

पाहा ‘मिर्झापूर २’चा जबरदस्त ट्रेलर