Video: खिलाडीकुमार अक्षयच्या ‘मिशन मंगल’चा टिझर आऊट

Mumbai

जगन शक्त‍ी दिग्दर्शित ‘मिशन मंगल’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच खिलाडी अक्षय कुमार म्हणजे अभिनेता अक्षय कुमारचा आगामी चित्रपट “मिशन मंगल’चा टीझर रिलीज झाला आहे. देशातील मिशन मंगल पूर्ण करणाऱ्या ऐत‍िहासिक घटनेवर हा चित्रपट आधारलेला असून यामध्ये अक्षय कुमार, विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा यांसह सर्व कलाकार या टीझरमध्ये दिसून येत आहेत.

‘मिशन मंगल’ हा चित्रपट म्हणजे भारताच्या मंगळ अभियानावर आधारित सत्य घटना आहे. हा टीझर अक्षय कुमारने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. टीझर शेअर करत अक्षयने लिहिले आहे की, ‘एक देश, एक सपना, एक इत‍िहास.’

या टीझरची सुरूवात राकेश धवनच्या भूमिकेपासून होत असून राकेश धवन हे सायंटिस्ट असून ते आपल्या टिमला सूचना करत असल्याचे दिसत आहे.

यापुर्वी ‘मिशन मंगल’ या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले होते, त्यावेळी अक्षयने लिहिले होते की, ‘अंडरडॉग्सची ही एक कहाणी जी भारताला मंगळावर घेऊन जाईल. शक्ती, धैर्य आणि कधीही हार न मानणारी ही कथा आहे. मंगळावरील भारताच्या स्पेस मिशनच्या सत्य घटनेवर आधारित ही कहाणी आहे. १५ ऑगस्टला आपल्यासाठी येत आहे.’

१५ ऑगस्टला या दिवशी खिलाडी कुमारला बॉक्स ऑफिसवर जोरदार टक्कर देण्यासाठी प्रभासचा ‘साहो’, जॉन अब्राहम ‘बाटला हाउस’ आणि वेबसीरीज ‘सेक्रेड गेम्स २’ हे चित्रपट रिलीज होणार आहे.