सिद्धार्थ आणि मितालीने दिली ‘गोड बातमी’

mitali mayekar and siddharth chandekar soon to get married next year
सिद्धार्थ आणि मितालीने दिली 'गोड बातमी'

यावर्षी अनेक मराठी कलाकारांनी आपल्या आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. अनेकांचा साखरपुडा केला तर अनेकांनी लग्न केले. आता मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय  सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांनी गोड बातमी दिली आहे. पुढच्या वर्षी सिद्धार्थ आणि मिताली मिस्टर अँड मिसेस होणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mitali Mayekar (@mitalimayekar)

सिद्धार्थ आणि मिताली यांच्या जोड्याला मराठी मनोरंजन विश्वातील क्युट कपल म्हटले जाते. मागच्या वर्षी या दोघांनी थाटामाटात साखरपुडा केला होता. यावर्षी दोघे लग्न करणार होते. पण कोरोना काळ आल्यामुळे लग्न लांबणीवर टाकले आहे. पण मितालीने काल पाडव्याच्या शुभेच्छा देत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. पुढच्या वर्षी सिद्धार्थ आणि मिताली लग्न बंधनात अडकणार आहेत.

२०१८ साली ‘व्हॅलेंटाईन डे’ला सिद्धार्थने पहिल्यांदा इन्स्टाग्राम पोस्टमधून आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. सिद्धार्थने मितालीला काही महिने डेट केल्यानंतर प्रपोज केले होते. याबाबत दोघांनी सोशल मीडियावर चाहत्यांनी माहिती दिली होती. दोघांनी २०१९मध्ये साखरपुडा केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mitali Mayekar (@mitalimayekar)

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, मितालीने मराठी चित्रपटसृष्टीत ‘ऊर्फी’ चित्रपटतून पदार्पण केले. त्यानंतर तिने ‘फ्रेशर्स’ या झी युवावरील मालिकेत काम केले. सध्या ती झी मराठीवरील ‘लाडाची मी लेक गं!’ या मालिकेत काम करत आहे. तर सिद्धार्थची ‘सांग तू आहेस का’ ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.