घरमनोरंजनलैंगिक शोषणाच्या आरोपावर फ्रिमॅनची माफी

लैंगिक शोषणाच्या आरोपावर फ्रिमॅनची माफी

Subscribe

हॉलीवूडचा गॉडफादर म्हणून ओळख असलेला, ८० वर्षीय प्रसीद्ध अभीनेता, दिग्दर्शक आणि प्रोड्यूसर मॉर्गन फ्रिमॅनने महिलांसोबत केलेल्या कृत्याप्रकरणी माफी मागितली.
फ्रिमॅनवर ८ महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले. फ्रिमॅनच्या एका महिला असिस्टंट प्रोड्यूसरने सुद्धा तिच्याशी २०१५ ला ‘गोईंग इन स्टाईल’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान गैरवर्तन केल्याचा आरोप केला.

फ्रिमॅनवरील आरोप
सीएनएन या वृत्तसंस्थेने सांगितले की, त्यांनी या आरोपा संदर्भात एक सर्वेक्षण केले, त्यात १६ महिलांचे मत विचारात घेण्यात आले. त्यातील आठ महिलांनी चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान फ्रिमॅन त्यांच्या सोबत गैर वर्तन करतात असे सांगितले.
तर उर्वरित आठ महिलांनी त्यांचे लैंगिक शोषण झाल्याचे म्हटले. त्या महिलांनी पुढे असेही सांगितले की, फ्रिमॅन त्यांना नेहमी चुकिच्या उद्देशाने स्पर्श करतात आणि त्यांच्या शरीरयष्टीवरुन, घातलेल्या कपड्यांवरुन अश्लिल शेरेबाजी करतात. त्यांच्या या वागण्यामुळे सर्व महिलांनी ठरविले होते की, त्यांच्यासोबत काम करतांना नेहमी शरीर संपूर्ण झाकेल असेच कपडे घालायचे.

- Advertisement -

फ्रिमॅनचे स्पष्टिकरण-
या सर्व आरोपानंतर फ्रिमॅनच्या प्रवक्त्याने म्हटले की, फ्रिमॅनवरील आरोप हे बिन बुडाचे आहेत. तसेच एक प्रकारे त्यांची बदनामी करण्याचा हा कट असल्याचेही त्यांनी म्हटले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -