ट्विटरवर जास्त फॉलोअर्स असणारे ‘हे’ आहेत ५ बॉलिवूड स्टार

आहेत बॉलिवूड विश्वातील सर्वाधिक फॉलोअर्स असणारे स्टार

Mumbai

सोशल मीडियाता वापर करणे हे आता सामान्य माणसाच्या आयुष्यातील अविभाज्य भागच झाले आहे. रोजच्या दिवसातील अधिकाधिक वेळ आपला सोशल मीडियावर घालवतो. अशा परिस्थितीत मनोरंजन क्षेत्रात काम करणारे नामवंत कलाकार देखील मागे नाहीत. हे कलाकार आपल्या जीवनातील घटना सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांसह शेअर करत असतात. त्यांमुळे त्यांचे फॉलोअर्स दिवसेंदिवस वाढताना दिसतात. हे आहेत बॉलिवूड विश्वातील सर्वाधिक फॉलोअर्स असणारे स्टार

शहारूख खान (३९ मिलियन)

बॉलिवूड विश्वातील किंगखान म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे शहारूख खान. शहारूख खानला बॉलिवूडचा बादशहा तसेच किंग ऑफ बॉलिवूड या नावाने देखील ओळखले जाते. ट्विटरवर फॉलोअर्स सर्वात जास्त असणाऱ्यांपैकी पहिल्या स्थानावर शहारूख खान आहे. सध्या त्याचे ट्विटरवर ३९ मिलियन फॉलोअर्स आहेत.

अमिताभ बच्‍चन (३८.६ मिलियन)

अमिताभ बच्चन हे बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीत चार दशकांपेक्षा जास्त काळ घालवलेल्या अमिताभ बच्चन यांना बिग बी म्हणूनही ओळखले जाते. या यादीत अमिताभ बच्चन दुसर्‍या क्रमांकावर आहेत आणि ट्विटरवर त्यांचे एकूण ३८.६ मिलियन फॉलोअर्स आहेत.

सलमान खान (३८.१ मिलियन)

बॉलिवूड विश्वातील भाईजान सलमान खान हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता तर आहेच तसेच निर्माता आणि एक समाजसेवक देखील आहे. त्याचे चाहते त्याचा उल्लेख सल्लू भाई आणि दबंग भाईजान म्हणून करतात. सलमान खान या ट्विटर फॉलोअर्सच्या यादीमध्ये ३८.१ मिलियन फॉलोअर्स असून तिसऱ्या क्रमांकावर आहे.

अक्षय कुमार (३२.१ मिलियन)

राजीव हरिओम भाटिया असे खरे नाव असणारा अक्षय कुमार हा एक प्रसिद्ध चित्रपट अभिनेता असून निर्माता देखील आहे. तसेच त्याने मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण देखील घेतले आहे. त्याच्या चाहत्यांमध्ये तो ‘अक्की’ या नावाने प्रसिद्ध आहे. बॉलिवूड विश्वात त्याला खिलाडियों के खिलाड़ी या नावाने देखील ओळखले जाते. अक्षयचे ट्विटरवर ३२.१ मिलियन फॉलोअर्स सध्या आहेत.

हृतिक रोशन (२६.४ मिलियन)

वार, सुपर ३०, काबिल अशा प्रसिद्ध चित्रपटात अभिनयाने चाहत्याच्या मनावर भुरळ घालणाऱ्या हृतिक रोशनचे फॅन कमी नाहीत. या अभिनेत्याने अनेक चांगले चित्रपट करून आपली स्वतःची वेगळी ओळख चित्रपटसृष्टीत निर्माण केली. मायक्रो ब्लॉगिंग सोशल मीडियावरील ट्विटरवर हृतिकचे एकूण २६.४ मिलियन फॉलोअर्स आहेत.


#NoBra कॅम्पेन सुरू करणाऱ्या ‘या’ प्रसिद्ध विदेशी अभिनेत्रीचा मृत्यू