घरमनोरंजन‘कृतांत’ लांबलेली गोष्ट

‘कृतांत’ लांबलेली गोष्ट

Subscribe

दत्ता भंडारे याने दिग्दर्शित केलेला ‘कृतांत’ हा पहिला चित्रपट आहे. निर्मिती करण्यासाठी निर्मात्याने लागलीच तयारी दाखवावी यासाठी त्याने कथाही तशीच निवडलेली आहे. सुरुवातीचे काही प्रसंग मानववस्तीत चित्रीत केलेले आहेत. नंतर कोकणातल्या निर्जन ठिकाणी जिथे झाडेझुडपे जास्त प्रमाणात आहेत. मानववस्ती नाही अशा ठिकाणी या चित्रपटाचे चित्रीकरण केलेले आहे ज्याला निर्माते म्हणून मिहीर शहा याचे सहकार्य लाभलेले आहे. संदीप कुलकर्णीची मुख्य व्यक्तिरेखा, कथानकाच्या अखेरीस गणेश आचार्य यांच्या दिग्दर्शनातले बॉलीवूड टच डान्स हे या चित्रपटाचे खास आकर्षण आहे. व्यावसायिक दृष्टिकोनापेक्षा कलात्मक नजरेने हा चित्रपट हाताळल्यामुळे प्रेक्षकांकडून या चित्रपटाचे कितपत स्वागत होईल हे सांगता येणे कठीण आहे.

साम्यक हा या चित्रपटाचा नायक आहे. कामात व्यस्त असल्यामुळे स्वत:बरोबर कुटुंबाला तो फारसा वेळ देत नाही. त्यामुळे घरात याविषयी केली जाणारी चर्चा पुढे वाद निर्माण करणारी ठरत असते. अशा स्थितीत त्याचे मित्र केवळ विरंगुळा म्हणून गावाला एकत्र येण्याचे ठरवतात. साम्यकची पत्नी रेवा हीसुद्धा या निर्णयाने आनंदीत होते. आपल्यासाठी नाही तर निदान स्वत:साठी वेळ काढतो आहे या एका हेतूूने ती स्वत:हून साम्यकची तयारी करते. स्वत:च्या कारने न जाता कटकटीचा वाटणारा खाजगी बसचा प्रवास ती त्याला करायला लावते. गावात पूर्वी आलेले मित्र काही अडचणी दर्शवतात. परिणामी इथेसुद्धा त्याला मित्रांपर्यंत पोहोचण्यासाठी पायी वेळप्रसंगी प्रवाशांनी भरलेल्या रिक्षाने प्रवास करावा लागतो. त्यात मोबाईलची रेंज जाते, एका निर्जण ठिकाणी भटक्या व्यक्तीच्या सान्निध्यात रात्र घालवावी लागते. ‘कृतांत’ हा एका रात्रीचा चित्रपट आहे जो नातेसंबंधांचा, एकत्रित जीवन काय आहे याचा सार सांगून जातो.

- Advertisement -

संदीप कुलकर्णीने यात भटक्या व्यक्तीची भूमिका केलेली आहे. गावापासून दूर फारसा विचार न करता जे काही छोटेखानी काम करून वाटसरुंकडून जे काही मिळेल त्यावर उदरनिर्वाह करणारा हा व्यक्ती आहे. निर्जन ठिकाणी संभ्रमात पडलेल्या व्यक्तींना मार्गदर्शन करणे हा त्याच्या जीवनाचा एक भाग झालेला आहे. तो सांगत असलेल्या कथेला रहस्याची जोड आहे. अर्धवट ऐकल्यामुळे प्रत्येक व्यक्तीला पुढच्या प्रवासात त्या गूढ प्रसंगांना सामोरे जावे लागते. त्यामुळे ही कथा मनोरंजन करणारी नाही तर रहस्य उलगडून सांगणारी आहे. संदीपने आपल्या पद्धतीने ती व्यक्तिरेखा प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल असे पाहिलेले आहे. साम्यक साकार केला आहे तो सुयोग गोर्हे या अभिनेत्याने. त्यानेसुद्धा कथेची गरज काय आहे हे लक्षात घेऊन भूमिका वटवलेली आहे. विद्या करंजीकर, सायली पाटील, फैज यांचासुद्धा कलाकार म्हणून सहभाग आहे. मनोरंजनापेक्षा जगण्याचे तत्त्वज्ञान यात संवादातून अधिक आणलेले आहे. काही प्रसंग लांबले गेल्यामुळे कंटाळाही येण्याची शक्यता आहे. त्यातून मध्यंतरानंतरचा भाग दिग्दर्शकाने छान जमवून आणलेला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -