‘आई कुठे काय करते?’ याची स्मृती इराणी यांना भुरळ

Mumbai
mp smriti irani share a video of marathi serial on instagram
खासदार स्मृती इराणी

सध्या सोशल मीडियावर ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेमधील एका सीनचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आई संबंधित भाष्य करणारा आहे. हा व्हिडिओ खासदार स्मृती इराणी यांनी देखील इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना स्मृती इराणी यांनी असं लिहिलं आहे की, ‘आई, माँ किंवा मॉम या शब्दाचा कोणत्याही भाषेतील उगम कुठे होतो हे आपण सांगू शकत नाही. पण आईला कृतज्ञता नव्हे तर प्रेम व्यक्त करण्यासाठी  मिठीची गरज असते.’

हेही वाचा ‘स्त्री’ चित्रपटाचा दुसरा, तिसरा भाग येणार

नेहमी घरी बसून राहणारी आई चार भिंतीत काय करते? हे आपल्या ठाऊक नसतं. म्हणून अनेक जण आईला पूर्ण दिवस तू घरी बसून काय करतेस?, असे अनेक प्रश्न तिला विचारता. आई आपल्या मुलांला लहानाचं मोठं करते. आपल्या घरासाठी ती नेहमी झगटत असते. स्वतःच्या इच्छा मारून ती दुसऱ्या इच्छा पूर्ण करण्यास मदत करते, तरी देखील ती घरी बसून पूर्ण दिवस काय करते? असा प्रश्न तिला विचारला जातो. या प्रश्नालाच सडेतोड उत्तर देणारा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओला २० लाखांपेक्षा जास्त लोकांची पसंती मिळाली आहे.

हेही वाचाकास्टिंग काऊचला दोनदा बळी पडली ‘ही’ बॉलिवूड अभिनेत्री

सध्या झी मराठीवरील ‘अग्गंबाई सासूबाई’ ही चांगलीच गाजत आहे. या मालिकेत सासू आणि सूनेच्या अनोख्या आणि प्रेमळ नात्याचं बंधन एक वेगळ्या पद्धतीने दाखवण्यात आलं आहे. सून आपल्या सासूची बाजू कशाप्रकारे मांडते या व्हिडिओतून आपल्याला पाहायला मिळत आहे.